AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांनी विकली मुंबईतील मोठी संपत्ती, विविध चर्चांना उधाण, अखेर ही वेळ…

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन कायमच चर्चेत असतात. बिग बींचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता नुकताच अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील गोरेगाव येथील फ्लॅटबद्दल मोठी माहिती पुढे येतंय. बिग बींनी ते फ्लॅट विकले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी विकली मुंबईतील मोठी संपत्ती, विविध चर्चांना उधाण, अखेर ही वेळ...
Amitabh Bachchan
| Updated on: Nov 05, 2025 | 10:11 AM
Share

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन कायमच चर्चेत असतात. त्यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला असून 83 व्या वर्षीही चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसतात. काैन बनेंगा करोडपती शोच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आठवड्यातून एकदा भेटतात. अमिताभ बच्चन यांनी चांगला आणि वाईट असे दोन्ही काळ बॉलिवूडमध्ये बघितले आहेत. एक काळ असा होता की, अमिताभ बच्चन यांचे एका मागून एक चित्रपट फ्लॉप जात होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा आयुष्यात मागे वळून न बघता फक्त हीट चित्रपट दिली. अमिताभ बच्चन आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत मुंबईत जलसा बंगल्यात राहतात. जलसा बंगल्यासोबतच प्रतिक्षा हा देखील आलिशान बंगला त्यांचा मुंबईत आहे. आता नुकताच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल मोठा निर्णय घेतलाय.

अमिताभ बच्चन यांनी नुकताच मोठा निर्णय घेत त्यांचे मुंबईतील दोन फ्लॅट विकली आहेत. हे फ्लॉट मुंबईतील प्रीमियम लोकेशनवरील होते. अमिताभ बच्चन यांना फ्लॅट का विकण्याची वेळ आली, यावरून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. दोन्ही फ्लॅट गोरेगाव पूर्वेतील ओबेरॉय एक्झिट बिल्डिंगमध्ये होती. 2012 ला 8.12 कोटींना अमिताभ बच्चन यांनी हे फ्लॅट खरेदी केले होते. ओबेरॉय एक्झिट बिल्डिंगच्या 47 व्या मजल्यावर हे फ्लॅट होती.

जानेवारी महिन्यातच अमिताभ बच्चन यांनी अंधेरी येथील द अटलांटिस इमारतीत असलेली त्यांची डुप्लेक्स अपार्टमेंट विकली होती. तब्बल 83 कोटी याची किंमत त्यांना मिळाली. मागील काही दिवसांपासून अमिताभ बच्चन हे सतत मुंबईमधील त्यांची संपत्ती विकताना दिसत आहेत. गोरेगावमध्ये फ्लॅट खरेदी करून अमिताभ यांनी 47 टक्के नफा कमावला आहे. पहिला फ्लॅट आशा ईश्वर शुक्ला यांनी 6 कोटी रुपयांना खरेदी केला होता.

अमिताभ बच्चन मागील काही दिवसांपासून रिअल इस्टेटमध्ये मोठा पैसा गुंतवताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन आणि अभिषेक यांनी मुलुंड पश्चिमेतील ओबेरॉय रिअल्टीच्या एटर्निया प्रकल्पात तब्बल 10 फ्लॅट खरेदी केले होते, ज्याची एकूण किंमत 24.95 कोटी रुपये होते. आलिबागमध्येही नुकताच मोठी जमीन अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलीये. त्यांनी स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशी ही जमीन खरेदी केली होती.

मिलिंद नार्वेकर राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'शिवतीर्थ'वर, कारण नेमकं काय?
मिलिंद नार्वेकर राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'शिवतीर्थ'वर, कारण नेमकं काय?.
ठाकरेंना मोठा झटका, काँग्रेस स्वबळावर लढणार; असलम शेख यांचं मोठं विधान
ठाकरेंना मोठा झटका, काँग्रेस स्वबळावर लढणार; असलम शेख यांचं मोठं विधान.
अलख निरंजन...हातात त्रिशूळ घेऊन गावकरी सज्ज, बिबट्याला म्हणावं ये आता
अलख निरंजन...हातात त्रिशूळ घेऊन गावकरी सज्ज, बिबट्याला म्हणावं ये आता.
पराभव स्वीकारा, जो जिता वही सिंकदर...फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार काय?
पराभव स्वीकारा, जो जिता वही सिंकदर...फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार काय?.
नको तिथं चोच मारायची...निवेदिता सराफ यांच्यावर किशोरी पेडणेकर भडकल्या
नको तिथं चोच मारायची...निवेदिता सराफ यांच्यावर किशोरी पेडणेकर भडकल्या.
बिहारमध्ये फडणवीसांची हवा,48 मतदारसंघात धुरळा, NDAला काय बुस्ट मिळाला?
बिहारमध्ये फडणवीसांची हवा,48 मतदारसंघात धुरळा, NDAला काय बुस्ट मिळाला?.
ब्रेक फेल... कंटेनरनं वाहनं उडवली, पुणेकरांचं डेथ स्पॉटवर तिरडी आंदोलन
ब्रेक फेल... कंटेनरनं वाहनं उडवली, पुणेकरांचं डेथ स्पॉटवर तिरडी आंदोलन.
तो आला त्याला माणसं दिसली...4 तास थरार, धिप्पाड बिबट्याचा बघा CCTV
तो आला त्याला माणसं दिसली...4 तास थरार, धिप्पाड बिबट्याचा बघा CCTV.
बिहार निकाल EVMमधून कसा आला? पवारांनी केलं असं विश्लेषण, चर्चांना उधाण
बिहार निकाल EVMमधून कसा आला? पवारांनी केलं असं विश्लेषण, चर्चांना उधाण.
निवेदिता सराफ कट्टर BJP समर्थक...बिहारच्या निकालाचा व्यक्त केला आनंद
निवेदिता सराफ कट्टर BJP समर्थक...बिहारच्या निकालाचा व्यक्त केला आनंद.