AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटचा स्वीकार करायलाच हवा…, अर्जुन कपूर याच्याबद्दल मोठी अपडेट, चाहत्यांना सतावतेय चिंता

Arjun Kapoor : अर्जुन कपूरबद्दल मोठी अपडेट समोर... 'त्या' एका पोस्टमुळे वाढली चाहत्यांची चिंता, त्या पोस्टमध्ये लिहिलंय, 'शेवटचा स्वीकार करायलाच हवा आणि...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अर्जुन कपूर याची चर्चा...

शेवटचा स्वीकार करायलाच हवा..., अर्जुन कपूर याच्याबद्दल मोठी अपडेट, चाहत्यांना सतावतेय चिंता
| Updated on: Apr 10, 2026 | 11:02 AM
Share

Arjun Kapoor : अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेल कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. आता देखील एका मोठ्या कारणामुळे अभिनेता चर्चेत आला आहे. अर्जुन याच्या आयुष्यातील एका मोठ्या अध्यायाचा अंत झाला आहे का? अभिनेत्याने पोस्ट केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे… अभिनेत्याने अशी पोस्ट का शेअर केली… असाच प्रश्न आता सर्वत्र उपलब्ध होत आहे. अभिनेत्याच्या पोस्टमुळे चाहत्यांची चिंता देखील वाढली आहे… शिवाय अनेकांनी अभिनेत्याला नेमकं झालं तरी काय असा प्रश्न देखील विचारलेला आहे.

सांगायचं झालं तर, खरं तर, 9 एप्रिल 2026 रोजी, अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक गूढ आणि रहस्यमय पोस्ट शेअर केली, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. आपल्या पोस्टमध्ये अर्जुनने लिहिले, “गोष्टी तुमच्या मनासारख्या संपल्या नाहीत तरीही, तुम्ही शेवट स्वीकारला पाहिजे.” त्याने ही पोस्ट का केली आहे की नाही हे उघड केले नाही, परंतु सोशल मीडियावर लोकांनी अभिनेत्यासोबत सर्व काही ठीक आहे की नाही याबद्दल तर्कवितर्क सुरू केले आहेत.

अर्जुन कपूरने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच, नेटकऱ्यांनी त्याच्या स्टोरीवर तर्कवितर्क सुरू केले आणि चाहत्यांना अभिनेत्याची काळजी वाटू लागली. अभिनेत्याच्या पोस्टमुळे रेडिटवर बरीच चर्चा होत आहे. अर्जुनच्या पोस्टचा स्क्रीनशॉट पोस्ट करत एका युझरने लिहिले, “मला खरंच आशा आहे की अर्जुन ठीक असेल. आधी त्याच्या आईच्या वाढदिवसाची ती पोस्ट, आणि आता हे…”

पोस्टवर कमेंट करत अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘मला असं वाटतं की, तो डिप्रेशनमध्ये… ‘, रोहित शेट्टीच्या सिनेमामुळे त्याच्या करिअरला चालना मिळाली, पण आता तो बेरोजगार दिसतोय. त्याचे त्याच्या बहिणीसोबतही काही भांडण झाले आहे का?’ दुसऱ्या एकाने लिहिले, ‘मला फक्त आशा आहे की अर्जुन ही टॉक्सिक फिल्म इंडस्ट्री सोडून देईल, कारण त्याला इथे फक्त द्वेषच मिळाला आहे. त्याने या झगमगाटापासून दूर, दुसऱ्या कशावर तरी लक्ष केंद्रित केलं पाहिजे.’ अर्जुन कपूरच्या पोस्टवर अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...