AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदाचे फक्त अफेअर्स नाही तर सर्व डार्क सिक्रेट समोर आलेच असते पण…, अभिनेत्याबद्दल मोठी अपडेट समोर

अभिनेता गोविंदा आता त्याच्या प्रोफेशनल आयु्ष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. आता देखील अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, पत्नी सुनीता अहुजा 'लॉक अप 2' शोमधून बाहेर आल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. सुनीताचा शोमधील प्रवास संपला की संपवला? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

गोविंदाचे फक्त अफेअर्स नाही तर सर्व डार्क सिक्रेट समोर आलेच असते पण..., अभिनेत्याबद्दल मोठी अपडेट समोर
गोविंदा - सुनीता अहुजा
| Updated on: Jul 13, 2026 | 10:00 AM
Share

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता गोविंदा याची बायको सुनीता आहुजा ‘लॉक अप 2’ शोमधून अखेर बाहेर पडली आहे. सांगायचं झालं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून सुनीता, गोविंदा याच्या खासगी आयुष्याचा खुलासा करताना दिसून आली. दरम्यान, शोमध्ये देखील तिने अनेक धक्कादायक खुलासे केले. अशात प्रकृती ठिक नाही, डायबिटीज आणि मोनोपॉज यांसारखी कारणं सांगत सुनीता हिचा शोमधील प्रवास संपला. गोविंदा आणि मुलगी टिना सुनीता हिला घेण्यासाठी पोहोचले. पण सुनीता शोमधून बाहेर आल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या आहेत.

सुनीताची प्रकृती की गोविंदाचे डार्क सिक्रेट?

सुनीता हिच्या जाण्यानंतर सोशल मीडियावर एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. अनेक युजर्सचा असा दावा आहे की, प्रकृती अस्वास्थ हे तिच्या जाण्याचं एकमेव कारण नव्हतं आणि त्यामागे काहीतरी मोठी गोष्ट दडलेली असू शकते. सांगायचं झालं तर, ‘लॉक अप 2’ शोचा एक महत्त्वाचा नियम आहे. शोमध्ये असताना स्पर्धकांवर असे प्रसंग येतात, जेव्हा त्यांना स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आयुष्यातील मोठे सत्य सर्वांसमोर सांगावे लागतात.

याच कारणामुळे आता सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. नेटकऱ्यांचा असा दावा आहे की, जर सुनीता शोमध्ये आणखी काही दिवस राहिली असती. तर तिने गोविंदा याच्याबद्दल अनेक मोठे आणि धक्कादायक खुलासे केले असते. ज्याचा परिणाम गोविंदा आणि त्याच्या कुटुंबियांवर झाला असता.

असं सांगितलं जात आहे की, याच कारणामुळे गोविंदा स्वतः आपली मुलगी टीनासोबत सुनीता हिला आणायला गेलेला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट्सवरून असं दिसून येतं की, सुनीता हिने केलेल्या विधानांमुळे गोविंदा यांची सार्वजनिक प्रतिमा अलीकडच्या काळात आधीच चर्चेचा विषय ठरली होती. अशा परिस्थितीत, आणखी एखादी नवीन बाब समोर आली असती तर त्यावरून अधिक चर्चा रंगली असती. गोविंदा एका प्रभावशाली कुटुंबातून येतो; तो फक्त एक अभिनेता असण्यासोबतच ते राजकारणी देखील आहे.

गोविंदा – सुनीता अहुजा

गोविंदा याची पत्नी सुनीता अहुजा हिची लोकप्रियता आता गगनाला भिडली आहे. सोशल मीडियावर देखील सुनीता हिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. सांगायचं झालं तर, सुनीता दिवसागणिक पुढे जात आहे. पण करियरमध्ये पुढे जाण्यासाठी गोविंदा याच्या नावाचा वापर करत आहे… अशी चर्चा देखील सोशल मीडियावर रंगली आहे.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश