Love Life : ‘बायकोला एक्सट्रा मॅरिटल अफेअर ठेवायचे होते…’, असं म्हणणारा अभिनेता आता 30 वर्ष लहान चौथ्या बायकोसोबत फिरतोय
Love Life : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना दोन पेक्षा अधिक लग्न केले आहेत. अशाच अभिनेत्यांमधील एक अभिनेता, ज्याने चार लग्न केली. पण पहिल्या बायकोबद्दल म्हणालेला, बायकोला एक्सट्रा मॅरिटल अफेअर ठेवायचे होते...; पण आता तोच अभिनेता 30 वर्ष लहान चौथ्या बायकोसोबत फिरतोय...

Love Life : झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटींची चर्चा त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम रंगलेली असते.सेलिब्रिटी कायम अफेअर, लग्न आणि घटस्फोट या कारणांमुळे चर्चेत असतात. आता देखील अशाच एका अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, ज्याने स्वतःपेक्षा 30 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत चौथं लग्न केलं. पण पहिल्या बायकोबद्दल अभिनेता म्हणालेला, ‘माझ्या बायकोला एक्सट्रा मॅरिटल अफेअर ठेवायचे होते…’, अशात दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभितेने कबीर बेदी आहे, कबीर बेदी यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण ते कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. ट
सांगायचं झालं तर, कबीर बेदी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलर होत आहे. व्हिडीओमध्ये कबीर बेदी त्यांच्या ओपन मॅरिजबद्दल बोलताना दिसले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या व्हिडिओमध्ये कबीर बेदी यांनी स्पष्टपणे असं म्हटलं होतं की, त्यांनी ओपन मॅरेजचा निर्णय घेतला होता कारण त्यांना अफेअर्स करायचे होते. कबीर बेदी यांचे पहिले लग्न प्रोतिमा बेदी यांच्याशी झाले होते.
प्रोतिमा या ओडिसी नृत्यांगना होत्या आणि आता या जगात नाहीत. मात्र या व्हायरल व्हिडिओमध्ये कबीर बेदी म्हणालेले, “मलाही अफेअर्स करायचे होते आणि तिला देखील अफेअर्स करायचे होते. त्यामुळे सर्वात उत्तम मार्ग हा होता की, तुला जे करायचे आहे ते तू कर आणि मला जे करायचे आहे ते मी करीन. आपण एकत्र राहू आणि मुलांचा सांभाळही एकत्र करू. पण हे शक्य झालं नाही आणि नंतर आम्ही वेगवेगळे राहण्याचा आणि घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
यावर कबीर बेदी पुढे म्हणाले, ‘माझी त्यांच्यासाठी जबाबदारी आहे, हे मला माहिती होतं आणि मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. मी तिला आणि मुलांना पूर्ण सपोर्ट केला. पण आयुष्यभर आम्ही चांगले मित्र म्हणून राहिलो. आमची दोन मुले होती आणि आमची इच्छा होती की, त्यांनी हे समजून घ्यावे की जरी आम्ही आता एकत्र राहू शकत नसलो, तरी आम्ही दोघेही त्यांची आई-वडील म्हणून कायम राहू.’
कबीर यांनी असं देखील सांगितलं होतं की, ‘आम्ही जे काही करु शकलो, ते आम्ही चांगल्या प्रकारे केलं. पण आम्हला नेहमीच खंत वाटते आणि त्यांच्याबद्दल विचार करणं देखील चांगले आहे. पण त्यांच्याबद्दल वारंवार विचार करणं चांगली गोष्ट नाही. भूतकाळात जगणे अजिबात चांगले नाही.”
कबीर यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, सध्या कबीर बेदी त्यांच्या चौथ्या पत्नी परवीन दुसांझ यांच्यासोबत आनंदाने राहत आहेत. कबीर बेदी यांनी त्यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी लग्न चौथं केलं होतं. परवीन या कबीर यांच्यापेक्षा जवळपास 30 वर्षांनी लहान आहेत.
