AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिलीजपूर्वीच हा चित्रपट ठरणार 2026 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर? थिएटरबाहेर तिकिटासाठी लागणार रांगा, टीझर पाहूनच….

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर 2' चा नुकताच टीझर रिलीज झाला आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांनी 2026 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणार असल्याचं म्हटलं आहे.

रिलीजपूर्वीच हा चित्रपट ठरणार 2026 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर? थिएटरबाहेर तिकिटासाठी लागणार रांगा, टीझर पाहूनच....
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 03, 2026 | 12:57 PM
Share

Dhurandhar 2 teaser released : गेल्या काही दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर असे काही चित्रपट रिलीज झाले ज्यांनी बॉक्स ऑफिसवर तर धुमाकूळ घातलाच पण त्यानंतर ओटीटीवर प्रदर्शित होताच हा चित्रपट टॉप 1 मध्ये आला. पण अशातच आता या चित्रपटाचा सिक्वेलचा टीझर रिलीज झाला असून या टीझरने तर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. काही मिनिटांमध्ये या चित्रपटाच्या टीझरला मोठ्या प्रमाणात ह्यूज मिळाले आहेत.

बॉलिवूडचा एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘धुरंधर 2’ चा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनेक दिवसांपासून या टीझरची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी निर्मात्यांनी ‘धुरंधर 2’चा टीझर अधिकृतरित्या रिलीज केला असून तो पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

टीझरमध्ये रणवीर सिंगचा आक्रमक, दमदार आणि वेगळ्या अंदाजातील अवतार पाहायला मिळतो. त्याची देहबोली, संवादफेक आणि अ‍ॅक्शन सीन पाहून हा चित्रपट जबरदस्त मनोरंजन देणार असल्याचा अंदाज प्रेक्षक व्यक्त करत आहेत. पहिल्याच झलकित रणवीर सिंगने चित्रपटासाठी घेतलेली मेहनत स्पष्टपणे दिसून येते.

‘धुरंधर 2’ हा चित्रपट ‘धुरंधर’ या पहिल्या भागाचा पुढचा भाग असून, यामध्ये कथा अधिक तीव्र, भव्य आणि थरारक स्वरूपात मांडण्यात आल्याचं टीझरवरून स्पष्ट होत आहे. टीझरमधील पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी आणि अ‍ॅक्शन सीक्वेन्सेस यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चाहत्यांनी रणवीर सिंगच्या लूकचं आणि अभिनयाचं भरभरून कौतुक केलं असून, हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायलाच हवा अशा प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. त्यासोबत हा चित्रपट 2026 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणार असल्याचे देखील काही चाहते म्हणत आहेत. काही तासांतच टीझरला लाखो व्ह्यूज मिळाले असून तो ट्रेंडिंगमध्येही सामील झाला आहे.

रणवीर सिंग हा आपल्या प्रत्येक चित्रपटात वेगळी भूमिका आणि वेगळा अंदाज घेऊन प्रेक्षकांसमोर येतो. ‘धुरंधर 2’ मधील त्याचा अवतारही याला अपवाद नाही. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल असा अंदाज सिनेवर्तुळात व्यक्त केला जात आहे. सध्या तरी टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली असून, आता सर्वांच्या नजरा ‘धुरंधर 2’च्या ट्रेलर आणि रिलीज डेटकडे लागल्या आहेत. रणवीर सिंगच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट एक मोठी मेजवानी ठरणार यात शंका नाही.

Follow Us
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
"बॅनर A-1, पण रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीचा"; ठाकरेंचा भरत गोगावलेंन टोला
आदित्य ठाकरेंचा सवाल:
सुटे तेल बंदीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना