
बिग बॉस मराठी 5 चे सीजन चांगलेच रंगात आल्याचे बघायला मिळतंय. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात जोरदार हंगामा होताना देखील दिसतोय. नुकताच रितेश देशमुख याने घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास घेतला. सहा जण आठवड्यात नॉमिनेशनमध्ये होते. मात्र, बिग बॉसचे हे सीजन चांगले सुरू असल्याने या आठवड्यात घरातून कोणीही बाहेर पडणार नसल्याचे रितेश देशमुख याने स्पष्ट केले. विशेष म्हणजे यावेळी अक्षय कुमार हा बिग बॉस 5 च्या मंचावर पोहोचला होता. यावेळी घरातील सदस्यांसोबत फुल मस्ती करतानाही अक्षय कुमार हा दिसला. सूरज चव्हाणच्या डान्सच्या खास स्टेपवर डान्स करताना अक्षय कुमार आणि रितेश देशमुख दिसले.
हेच नाही तर सूरज चव्हाण याच्यासमोर थेट अक्षय कुमार हा हात जोडताना देखील दिसला. आपण हारल्याचे मान्य करताना अक्षय कुमार हा दिसला. बिग बॉसच्या मंचावर अक्षय कुमार याची मोठी पोलखोल रितेश देशमुख याने केलीये. रितेश देशमुख म्हणाला की, काहीही झाले तरीही अक्षय कुमार याच्या हातामध्ये अजिबातच मोबाईल द्यायचा नाही.
माझ्या मोबाईलवरून चोरून विद्या बालनला थेट अक्षय कुमार याने ‘लव्ह यू’चा मेसेज केला. त्याने असा कोणता मेसेज विद्याला केला होता, याची मला अजिबातच कल्पना नव्हती. यामुळे मी चुकूनही अक्षय कुमार याच्याकडे मोबाईल देत नसल्याचे रितेश देशमुख याने स्पष्ट केले. तुमच्या मोबाईलला काही पासवर्ड असला तरीही तो ओपन करून अक्षय मेसेज करत असल्याने रितेश देशमुख याने म्हटले.
हेच नाही तर घरातील सदस्यांचे मोबाईल अक्षय कुमार याच्याकडे दिसले. घरातील सदस्यांच्या मोबाईलमध्ये आलेले मेसेज वाचतानाही अक्षय कुमार हा दिसला. यावेळी अरबाज याने सरळ म्हटले की, मी माझा पासवर्ड विसरलो आहे. अक्षय कुमार याच्यासमोर घरातील सदस्य खास डान्स करून दाखवताना देखील दिसले.
अक्षय कुमार आणि सूरज चव्हाण यांच्यातील डॉयलॉग लोकांना चांगलेच आवडले. रितेश देशमुख याने अक्षय कुमारला मोठे चॅलेज दिले. मात्र, त्याने हार मानली. सूरच चव्हाण याच्यासमोर अक्षय कुमार याने हार मानल्याने सर्वांनाच एक मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले. बिग बॉस मराठी 5 बद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ नक्कीच बघायला मिळतंय. हे सीजन सर्व रेकॉर्ड ब्रेक करत असल्याचे सांगितले जातंय.