वरुण धवन पत्नी आणि मुलीसह राहणार भाड्याच्या घरात, हृतिक रोशनच्या सी फेसिंग अपार्टमेंट..

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन हा सध्या तूफान चर्चेत आहे. वरुण धवनच्या घरी नुकताच मुलीचे आगमन झाले. वरुण धवन हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय दिसतोय. मुलीच्या जन्मानंतर वरुण धवन याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला. आता वरुण धवनबद्दल मोठे अपडेट येताना दिसत आहे.

वरुण धवन पत्नी आणि मुलीसह राहणार भाड्याच्या घरात, हृतिक रोशनच्या सी फेसिंग अपार्टमेंट..
Varun Dhawan
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 4:24 PM

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. वरुण धवन याची पत्नी नताशा दलाल हिने 3 जून 2024 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. वरुण धवन आणि नताशा यांनी अजून मुलीच्या नावाची घोषणा केली नाहीये. हेच नाही तर मुलीचा एकही फोटो अजून शेअर करण्यात नाही आला. चाहते हे मुलीच्या जन्मानंतर वरुण धवन आणि नताशा यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. मुलीच्या जन्मानंतर वरुण धवन याने सोशल मीडियावर एक अत्यंत खास अशी पोस्ट देखील शेअर केली. जी पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसली.

वरुण धवन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. वरुण धवन, नताशा आणि त्यांच्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. या फोटोमध्ये वरुण धवन हा आपल्या लेकीला रूग्णालयातून घरी घेऊन जाताना दिसला. मात्र, यावेळी मुलीचा चेहरा दिसू दिला नाही.

आता लेकीच्या जन्मानंतर वरुण धवन हा नव्या घरात शिफ्ट होणार असल्याचे सांगितले जातंय. सध्या वरुण धवन आणि नताशा हे जुहू येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. जी वरुण धवन याने 2017 मध्ये विकत घेतली होते. आताच आलेल्या रिपोर्टनुसार वरुण धवन हा भाड्याच्या घरात शिफ्ट होणार आहे. अत्यंत आलिशान घरात राहण्यास वरुण धवन जातोय.

वरुण धवन हा हृतिक रोशनचा भाडेकरी होणार आहे. होय तुम्ही खरे ऐकले. वरुण धवन हा हृतिक रोशनच्या मुंबई येथील जुहू येथील सी फेसिंगअपार्टमेंटमध्ये शिफ्ट होत आहे. वरुण धवन याने हे घर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतल्याचे कळतंय. हे एक अत्यंत आलिशान असे घर असल्याचे देखील सांगितले जात आहे. अक्षय कुमार आणि साजिद नाडियाडवाला यांचा शेजारी वरुण धवन होणार आहे.

मुलीच्या जन्मानंतर वरुण धवन हा चांगलाच आनंदात असल्याचे बघायला मिळतंय. वरुण धवन आणि नताशा दलाल यांचे लग्न अत्यंत आलिशान पद्धतीने आलिबाग येथे झाले. या लग्नासाठी अनेक बॉलिवूड कलाकार पोहचले होते. काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत वरुण धवन याने स्पष्ट केले होते की, आपल्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे.

Non Stop LIVE Update
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.