अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चनलाही थेट मोठी धमकी, मुंबईत 200..
बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची मोठी धमकी देण्यात आली. मुंबईत दिल्ली सेलने दोन शूटरला अटक केली. त्यातच आता सोशल मीडियावर धक्कादायक पोस्ट शेअर करण्यात आली.

महानायक अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक भूमिका बजावल्या आहेत. अमिताभ बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन यांच्या एका झलकसाठी चाहते मोठी गर्दी त्यांच्या बंगल्याबाहेर करतात. अमिताभ बच्चन पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, मुलगी श्वेता बच्चन, सून ऐश्वर्या राय आणि आपल्या नातवांसोबत राहतात. अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त कायमच बघायला मिळतो. चाहत्यांची गर्दी तूफान असते. अमिताभ बच्चन अनेकदा आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी बाहेरही येतात. काही दिवसांपूर्वीच अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. त्याच आरोपींनी अमिताभ बच्चन यांच्याही घराची रेकी केली होती. पोलिस चाैकशीत याबाबतची माहिती ही पुढे आली.
त्यातच पोलिसांनी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर गोळीबार करण्याचा कट आखणाऱ्यांना अटक केली. आरोपींकडून मोठा खुलासा करण्यात आला. आरोपींकडून थेट जलसा बाहेर गोळीबार करण्याचा कट आखण्यात आला. पण पोलिसांनी त्यापूर्वीच हा कट उधळून लावला. बिश्नोई टोळीकडूनच हा कट आखला गेल्याचे सांगितले जात होते.
त्यातच आता पुन्हा एकदा अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. गँगस्टर गोल्डी ढिल्लोंची यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. मुंबईत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दोन शूटर विकास ठाकूर आणि दीपक सिंह यांना अटक केल्यानंतर ही पोस्ट शेअर करण्यात आली. दोन्ही आरोपींना अन्य गँगशी जोडू नये, असे गोल्डी ढिल्लोंचे पोस्टमधून स्पष्टीकरण दिले आहे.
त्यांच्या अटकेने कोणताही कट उधळलेला नाही, मुंबईत आमचे आणखी 200 साथीदार तयार असल्याचा दावा, त्याने या पोस्टमध्ये केला. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना बुलेटप्रूफ केबिनमध्येही मारण्याची धमकी पोस्टमधून देण्यात आली. कट उधळला नाही तर आम्ही हल्ल्याच्या तयारीतच आहोत असाही कथित स्वरुपात इशारा या पोस्टच्या माध्यमातून देण्यात आला. या पोस्टने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसही अलर्ट मोडवर आहेत.