AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांच्यावर झालेलं 90 कोटींचं कर्ज, फेडण्यासाठी घर विकलेलं, शेवटी त्यांनी 18 तास…, रजनीकांत यांनी केला खुलासा

अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्या मैत्रीची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगली आहे. अशातच आता रजनीकांत यांनी अमिताभ यांच्याबद्दलचा कधीच न समोर आलेला किस्सा सांगितला आहे.

अमिताभ बच्चन यांच्यावर झालेलं 90 कोटींचं कर्ज, फेडण्यासाठी घर विकलेलं, शेवटी त्यांनी 18 तास..., रजनीकांत यांनी केला खुलासा
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 14, 2026 | 5:44 PM
Share

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, त्यांच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. जवळपास 90 कोटी रुपयांच्या कर्जामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढवले होते. अशा कठीण परिस्थितीतून त्यांनी कशी वाट काढली, याचा किस्सा सुपरस्टार रजनीकांत यांनी सांगितला होता. त्यांचा हा जुना व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे.

अमिताभ बच्चन यांनी अभिनय क्षेत्रात मोठे यश मिळवल्यानंतर ‘अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड’ (ABCL) ही निर्मिती कंपनी सुरू केली. मात्र, या व्यवसायात अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट आले आणि ते कर्जबाजारी झाले. या परिस्थितीत त्यांना आपली मालमत्ताही विकावी लागल्याचे सांगितले जाते.

कर्ज फेडण्यासाठी दिवसाचे 18 तास काम

रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन यांच्या संघर्षाबद्दल बोलताना सांगितले की, कठीण परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. आर्थिक अडचणी आणि आरोग्याच्या समस्यांचा सामना करत त्यांनी दिवसाचे तब्बल 18 तास काम केले. मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपले कर्ज फेडले आणि पुन्हा स्वतःचे आर्थिक आयुष्य उभे केले.

रजनीकांत यांच्या म्हणण्यानुसार, अमिताभ बच्चन यांनी नंतर आपले जुने घर पुन्हा विकत घेतले आणि त्याच परिसरात आणखी घरेही खरेदी केली. त्यांच्या या प्रवासातून संकट कितीही मोठे असले तरी मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यावर मात करता येते हे दिसून येते.

रजनीकांत मानतात अमिताभ बच्चन यांना गुरू

रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांनी ‘अंधा कानून’ , ‘गिरफ्तार’ आणि ‘हम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तब्बल 33 वर्षांनंतर 2024 मध्ये ‘वेट्टैयन’ या चित्रपटातून ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र आली. रजनीकांत अमिताभ बच्चन यांना आपले मार्गदर्शक मानतात.

अमिताभ बच्चन यांचा संघर्ष, त्यांची मेहनत आणि पुन्हा उभे राहण्याची जिद्द आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही कठीण काळात हार न मानणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या प्रवासामुळे त्यांच्या चाहत्यांच्या मनातील त्यांच्याबद्दलचा आदर अधिक वाढला आहे.

Follow Us
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?