AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जया बच्चन यांच्यासोबतच्या नात्यावर स्पष्टच बोलली ऐश्वर्या राय, म्हणाली, ज्या पद्धतीने मला…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय कायमच चर्चेत राहणारे नाव आहे. ऐश्वर्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे ती अधिक चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय.

जया बच्चन यांच्यासोबतच्या नात्यावर स्पष्टच बोलली ऐश्वर्या राय, म्हणाली, ज्या पद्धतीने मला...
Aishwarya Rai and Jaya Bachchan
| Updated on: Nov 03, 2025 | 1:54 PM
Share

मागील काही दिवसांपासून बच्चन कुटुंबियांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय ही चांगलीच चर्चेत आहे. ऐश्वर्याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. विशेष बाब म्हणजे बच्चन कुटुंबियांची सून झाल्यानंतरही ती चित्रपटांमध्ये धमाल करताना दिसली. 2007 मध्ये ऐश्वर्याने अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा लेक अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे बॉलिवूडचे हे लग्न सर्वात जास्त चर्चेत असणारे ठरले. अनेक नाट्यमय घडामोडी या लग्नादरम्यान घडल्या. अनेकांचे स्वप्न तुटली होती. सर्वकाही सुरळीत सुरू असताना मागील काही दिवसांपासून सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची सतत चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र, घटस्फोटाच्या चर्चांवर कोणीही भाष्य करण्यास तयार नाहीये.

ऐश्वर्या राय मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत कायमच स्पॉट होताना दिसते. बच्चन कुटुंबियांच्या सदस्यांसोबत फार कमी वेळा ती दिसते. ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांच्या नात्याबद्दल कायमच विविध चर्चा रंगताना दिसतात. जया बच्चन यांच्यासोबतच्या नात्यावर स्पष्टपणे बोलताना ऐश्वर्या राय ही दिसली आहे. पहिल्यांदाच तिने जया बच्चन आणि आपले नाते कसे आहे, यावर भाष्य केले.

ऐश्वर्या राय म्हणाली की, त्याची आई (जया बच्चन) माझ्यासाठी आईसारखी आहे आणि ज्या पद्धतीने मला स्वीकारण्यात आले आणि प्रेम देण्यात आले त्याबद्दल मी कृतज्ञ आहे… पहिल्यांदाच जया बच्चन यांच्यासोबतच्या नात्यावर ऐश्वर्या राय लग्नाच्या अगोदर बोलताना दिसली. मात्र, ऐश्वर्या राय हिने जुन्या एका मुलाखतीमध्ये जया बच्चन यांच्याबद्दल हे विधान केले होते. या मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन देखील उपस्थित होता.

फक्त जया बच्चन याच नाही तर सासरे अमिताभ बच्चन यांच्याबद्दलही बोलताना ऐश्वर्या राय ही दिसली होती. शक्यतो आपल्या काैटुंबिक गोष्टींबद्दल बोलताना ऐश्वर्या फार काही दिसत नाही. मात्र, तिने पहिल्यांदाच सासू जया बच्चन यांच्याबद्दल भाष्य केले होते. ऐश्वर्या राय हिने लग्नानंतरही अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच विदेशात ती एका पुरस्कार सोहळ्यासाठी देखील पोहोचली होती.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...