AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळेत क्लास सुरु असताना या अभिनेत्रीला अश्लील साइटवर दिसले स्वत:चे फोटो, घाबरली अभिनेत्री, म्हणाले- खूप त्रास…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचे शाळेत आयटीचा क्लास सुरु असताना 15 व्या वर्षी अश्लील साइटवर दिसले फोटो, प्रचंड घाबरलेली अभिनेत्री. म्हणाली मी कधी...

शाळेत क्लास सुरु असताना या अभिनेत्रीला अश्लील साइटवर दिसले स्वत:चे फोटो, घाबरली अभिनेत्री, म्हणाले- खूप त्रास...
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 06, 2026 | 1:46 PM
Share

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्री जाह्नवी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘पेड्डी’ मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती साऊथ सुपरस्टार राम चरणसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. दरम्यान, यावेळी जाह्नवीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक धक्कादायक अनुभव उघड केला आहे.

जाह्नवी कपूरने नुकत्याच राज शमनी यांच्यासोबत साधलेल्या संवादात सांगितले की, ती केवळ 15 वर्षांची असताना तिला एका अश्लील वेबसाइटवर स्वतःचा मॉर्फ केलेला फोटो पाहायला मिळाला होता.

ती म्हणाली, ‘मला हे डीपफेक होतं की काही वेगळं, हे समजलं नाही. पण एका पॉर्न साइटवर माझा फोटो होता. शाळेत आयटी क्लासदरम्यान काही मुलं अशा साइट्स उघडत असत आणि तिथे माझे फोटो दिसत होते. तो अनुभव माझ्यासाठी खूप विचित्र आणि त्रासदायक होता.’

‘ही पब्लिक फिगर असण्याची किंमत आहे का?’

जाह्नवीने सांगितले की, सुरुवातीला तिला वाटलं की कदाचित पब्लिक फिगर असल्याची ही किंमत असावी. पण आजही तिला या गोष्टीबद्दल अस्वस्थता वाटते. सोशल मीडियावर नैतिकता उरलेली नाही. माझ्या अनेक फोटोंना AI च्या मदतीने तयार केलं जातं. मी कधी असे कपडे घातले नाहीत किंवा असे फोटो काढले नाहीत. तरी ते माझ्या नावावर फिरत असतात.

या फेक फोटोंचा परिणाम तिच्या प्रोफेशनल आयुष्यावरही होत असल्याचे जाह्नवीने स्पष्ट केले. जर मी एखाद्या दिग्दर्शकाला सांगितलं की मला एखादा खास पोशाख घालायचा नाही तर ते माझे फेक फोटो दाखवून म्हणू शकतात की ‘तू आधी असं केलं आहेस’ असे ती म्हणाली.

तिने हेही मान्य केले की या विषयावर उघडपणे बोलण्यासाठी तिच्याकडे अजून पुरेशी ताकद नाही. आवाज उठवला तर त्याचा उलट परिणाम होण्याची भीतीही असते असे ती म्हणाली.

आगामी चित्रपटाची उत्सुकता

जाह्नवी कपूर अलीकडेच सनी संस्कारी की तुलसी कुमारी या चित्रपटात दिसली होती. आता तिचा पुढील चित्रपट पेड्डी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती राम चरणसोबत झळकणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

जाह्नवी कपूरच्या या खुलाशामुळे सोशल मीडियावरील डीपफेक आणि मॉर्फिंगसारख्या गंभीर समस्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. तिचा अनुभव अनेकांसाठी डोळे उघडणारा ठरत आहे.

Follow Us
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग.

मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग

उद्धव ठाकरे जे म्हणाले तोच ममता बॅनर्जींचा संदेश, 21 जुलैनंतर…पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार?.

उद्धव ठाकरे जे म्हणाले तोच ममता बॅनर्जींचा संदेश, 21 जुलैनंतर…पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार?

कसा आहे तब्बल २५०० कोटींचा सिनेमा? क्रिस्टोफर नोलनच्या The Odyssey ची जगभर महाक्रेज.

कसा आहे तब्बल २५०० कोटींचा सिनेमा? क्रिस्टोफर नोलनच्या The Odyssey ची जगभर महाक्रेज

‘डर्टी संजय राऊत.., लाज वाटायला पाहिजे…’, राणेंचं राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर; नागपुरातील रामरक्षा आंदोलनापूर्वी वातावरण तापलं.

‘डर्टी संजय राऊत.., लाज वाटायला पाहिजे…’, राणेंचं राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर; नागपुरातील रामरक्षा आंदोलनापूर्वी वातावरण तापलं

सिया-चेतनचा हादरवून टाकणारा कांड, जपानी व्हिडीओ पाहून केतनला…  चकवा देण्यासाठी असा होता प्लॅन!.

सिया-चेतनचा हादरवून टाकणारा कांड, जपानी व्हिडीओ पाहून केतनला… चकवा देण्यासाठी असा होता प्लॅन!

दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा जाहीर पाठिंबा, म्हणाले सरकारने संवाद साधावा!.

दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा जाहीर पाठिंबा, म्हणाले सरकारने संवाद साधावा!