Karisma Kapoor | सिनेमा मिळत नसल्यामुळे ‘या’ मार्गांनी करिश्मा कमावते कोट्यवधींची माया

बॉलिवूडपासून दूर असली तरी करिश्मा कपूर 'या' मार्गाने कमावते बक्कळ पैसे, अभिनेत्री कोट्यवधी संपत्तीची मालकीण... सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

Karisma Kapoor | सिनेमा मिळत नसल्यामुळे या मार्गांनी करिश्मा कमावते कोट्यवधींची माया
| Updated on: Jun 25, 2023 | 7:35 PM

मुंबई | फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात प्रसिद्ध कुटुंबातील दिग्गज कुटुंबापैकी एक म्हणजे कपूर. कपूर कुटुंबातील अनेक गोष्टी कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. कपूर कुटुंबातील मुली अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. पण गेल्या काही वर्षांपासून करिश्मा बॉलिवूडपासून दूर आहे. करिश्मा कपूर हिने ‘प्रेम कैदी’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेत्री एकापाठोपाठ एक ५ फ्लॉप सिनेमे दिले. पण करिश्माने कधीही मागे वळून पाहिलं नाही. महत्त्वाचं म्हणजे अभिनेता सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत देखील अभिनेत्रीची जोडी फेल ठरली.

‘दीदार’ , ‘जागृती’ आणि ‘निश्चय’ यांसारख्या सिनेमात अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली. पण कोणताही सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करु शकला नाही. पण तरी देखील माघार न घेता अभिनेत्रीने १९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘जिगर’ सिनेमातून चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. एवढंच नाही तर, ‘अनाडी’ सिनेमातून देखील अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

करिश्मा कपूर हिने जवळपास ५० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं. ‘राजा बाबू’, ‘आशिक’, ‘फिजा’, ‘हम साथ साथ हैं’, ‘हसीना मान जाएगी’, ‘दिल तो पागल है’, ‘हीरो नंबर 1’, ‘राजा हिंदुस्तानी’ आणि ‘जीत’ यांसारखे सुपरहीट सिनेमे करिश्माने बॉलिवूडला दिले. (karisma kapoor net worth)

२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डेंजरस इश्क’ सिनेमानंतर करिश्मा बॉलिवूडपासून दूर आहे. करिश्मा बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. करिश्माने २०१६ मध्ये संजय कपूरपासून घटस्फोट घेतला, तेव्हापासून ती आपल्या मुलांचं सिंगल मदर म्हणून सांभाळ करत आहे. समायरा आणि कियान असं करिश्माच्या मुलांचं नाव आहे.

करिश्मा सिनेमांपासून दूर असली तरी तिच्याकडे संपत्तीची कमतरता नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्मा कपूरची संपत्ती 12 मिलियन डॉलर म्हणजेच ८७ कोटी रुपये इतकी आहे. जाहिरात आणि मॉडेलिंगच्या माध्यमातून अभिनेत्री कोट्यवधींची कमाई करते. . ती Babyoye कंपनीची शेअरहोल्डर आहे. शिवाय अनेक शोमध्ये अभिनेत्र परीक्षकाची भूमिका देखील बजावते.

करिश्मा कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी करिश्मा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.