AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडची सौंदर्य क्वीन, जिला पाहून कलाकार डायलॉग विसरायचे, हॉलिवूड चित्रपटाची ऑफर नाकारणारी ही अभिनेत्री कोण?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री, जिला चित्रपटात घेण्यासाठी निर्मात्यांची लागायची लाईन. मिळाली होती हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी पण अभिनेत्रीने दिला होता नकार.

बॉलिवूडची सौंदर्य क्वीन, जिला पाहून कलाकार डायलॉग विसरायचे, हॉलिवूड चित्रपटाची ऑफर नाकारणारी ही अभिनेत्री कोण?
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 23, 2026 | 1:32 PM
Share

Bollywood Actress : भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळाची आठवण झाली की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते ते नाव म्हणजे मधुबाला. 14 फेब्रुवारी 1933 रोजी दिल्ली येथे जन्मलेल्या मधुबालांचे खरे नाव मुमताज जहां देहलवी होते. लहानपणापासूनच त्यांच्या चेहऱ्यावरची निरागसता आणि सौंदर्य यामुळे त्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असत. त्यामुळे अगदी लहान वयातच त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांनी ‘Basant’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीने कधीही मागे वळून पाहिले नाही. हळूहळू त्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि देखण्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या. त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा केवळ भारतातच नाही तर परदेशातही होऊ लागली.

हॉलिवूडचा मोठा प्रस्ताव

त्या काळात त्यांना एक धक्कादायक आणि ऐतिहासिक ऑफर मिळाली होती. ऑस्कर विजेते दिग्दर्शक Frank Capra यांनी त्यांना अमेरिकेत मोठ्या बजेटच्या चित्रपटांसाठी काम करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्या काळात एखाद्या भारतीय अभिनेत्रीला हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळणे ही अत्यंत मोठी गोष्ट होती. या ऑफरमुळे त्यांची कारकीर्द आंतरराष्ट्रीय स्तरावर झेपावली असती. मात्र मधुबालांनी हा प्रस्ताव नाकारला.

एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की हा निर्णय सोपा नव्हता पण त्यांच्या दृष्टीने यश म्हणजे केवळ पैसा आणि प्रसिद्धी नाही तर आपल्या कुटुंबीयांशी आणि मूल्यांशी प्रामाणिक राहणे अधिक महत्त्वाचे होते. त्यांनी आपल्या कुटुंबाला आणि देशाला प्राधान्य दिले.

अजरामर चित्रपट आणि सौंदर्य

सुमारे 22 वर्षांच्या कारकिर्दीत मधुबालांनी जवळपास 70 चित्रपटांमध्ये काम केले. अनेक चित्रपटांनी त्यांना इंडस्ट्रीत ‘सौंदर्यदेवी’चा मान मिळवून दिला. विशेषतः ‘मुगल-ए-आझम’मधील त्यांची अनारकलीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

त्यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र अनेक अडचणींनी भरलेले होते. बालपणात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले तर पुढे गंभीर हृदयविकाराने त्यांना सतत त्रास दिला. ‘मुगल-ए-आझम’च्या चित्रीकरणादरम्यानही त्या हृदयविकाराशी झुंज देत होत्या तरीही त्यांनी आपले काम पूर्ण केले. 23 फेब्रुवारी 1969 रोजी अवघ्या 36व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या अभिनयाचा ठसा आणि मोहक हास्य आजही रसिकांच्या हृदयात जिवंत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...