Actress Malaika- Amruta: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा बहीण अमृता अरोरासोबत करणार स्क्रीन शेअर

अरोरा सिस्टर्स नेटफ्लिक्स शो 'फेब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज'ची कॉपी करताना दिसत आहेत. "फेब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज" या शोमध्ये देखील बॉलिवूड कलाकारांच्या पत्नी त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य प्रेक्षकांसोबत शेअर करतात. मलायका आणि अमृता पहिल्यांदाच एका शोमध्ये एकत्र दिसणार आहेत

Actress Malaika- Amruta: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा बहीण अमृता अरोरासोबत करणार स्क्रीन शेअर
Malaika & Amrita Arora,
Image Credit source: Tv9
| Updated on: Sep 17, 2022 | 7:39 PM

बी-टाऊनमध्ये कपल्स आपण अनेकदा पाहतो. पण बॉलिवूडमध्ये(Bollywood) सिबलिंगच्या जोड्याही अनेकदा एकत्र दिसून येतो. यामध्ये करीना – करिश्मा, मलायका – अमृता, आलिया भट्ट – शाहीन या बहिणींची जोड्याही अनेक ठिकाणी दिसून येतात. या अभिनेत्री बहिणीची साथ सोडलेली दिसत नाहीत. छैया छैया गर्ल मलायका (Malaika)आणि तिची बहीण अमृता अरोरा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform)अरोरा सिस्टर नावाच्या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहेत. हा शो हॉलिवूडच्या प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘कीपिंग अप विथ कार्दशियन्स’ सारखा असू शकतो, असे बोलले जात आहे.

शेअर करणार त्यांचे अनुभव

मलायका आणि अमृता या दोघीही या शोमध्ये त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य प्रेक्षकांसोबत शेअर करताना दिसणार आहेत.मीडिया रिपोर्टनुसार मलायका व अमृताच्या बेस्ट फ्रेंड्स करीना आणि करिश्मा देखील या शोमध्ये दिसू शकतात. बॉलीवूडमध्ये या चौघींची मैत्री खूप प्रसिद्ध आहे. प्रत्येक पार्टीत त्या एकत्र दिसतात. यापूर्वी टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती गौहर खान तिची बहीण निगार खानसोबत खान सिस्टर नावाच्या शोमध्ये दिसली होती.

फेब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज”  शो

अरोरा सिस्टर्स नेटफ्लिक्स शो ‘फेब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ची कॉपी करताना दिसत आहेत. “फेब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज” या शोमध्ये देखील बॉलिवूड कलाकारांच्या पत्नी त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य प्रेक्षकांसोबत शेअर करतात. मलायका आणि अमृता पहिल्यांदाच एका शोमध्ये एकत्र दिसणार आहेत, हा शो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. बॉलीवूडमध्ये मलायका स्टाईल स्टेटमेंट सोबतच फिटनेससाठीही ओळखली जाते. यासोबत मलायका तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळेही चर्चेत असते. अर्जुनसोबतचे फोटोहीती सोशल मीडियावर शेअर करत असते. मीडिया रिपोर्टनुसार लवकरच ती विवाह बंधनात अडकणार आहे.