AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुरुष अशा महिलांकडे पाहतही नाहीत, त्यांना कशा महिला आवडतात? नीना गुप्ता यांचं मोठं वक्तव्य

पुरुष अशा महिलांकडे मॅरिज मटेरियल म्हणून पाहतात, पुरुषांना कशा महिला आवडतात? अभिनेत्री नीना गुप्ता यांचं मोठं वक्तव्य... पुरुषांच्या मानसिकतेवर नीना गुप्ता कायम मोठं वक्तव्य करत असतात.

पुरुष अशा महिलांकडे पाहतही नाहीत, त्यांना कशा महिला आवडतात? नीना गुप्ता यांचं मोठं वक्तव्य
अभिनेत्री नीना गुप्ता
| Updated on: Jan 09, 2026 | 1:52 PM
Share

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे तर चर्चेत असतातच पण त्यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा देखील कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. नीना गुप्ता त्यांच्या खासगी आयुष्यावर आणि सामाजिक मुद्यांवर कायम बोलताना दिसतात. अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी महिलांच्या परिस्थितीवर मोठं वक्तव्य केलं आहे. नीना यांच्या म्हणण्यानुसार, पुरुषांना स्वतंत्र आणि धीट महिला आवडत नाहीत. यावेळी नीना गुप्ता यांनी मोठा खुलासा केला, एका पुरुषासोबत त्यांचा साखरपुडा झालेला. पण नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता म्हणाल्या, ‘धीट महिला पुरुषांना मॅरिज मटेरियल वाटत नाही… अनेक पुरुषांना तर स्वतंत्र महिला आवडत देखील नाहीत. ज्या महिलांना स्वतःचे विचार आहेत. ज्या महिला काम करतात आणि कमावतात. त्यांच्या करियरसोबत एकनिष्ठ असतात. अशा महिलांचा पुरुष तिरस्कार करतात. ज्यांना त्यांच्या हक्कांवर बोलता येतं.’

नीना गुप्ता यांचा मोडला साखरपुडा…

नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, ‘मी सर्वसाधारणपणे बोलत आहे, सर्वांबद्दल नाही. पण हे आपल्या 95 टक्के लोकसंख्येसाठी खरं आहे. मी हे वादग्रस्त विधान करण्यासाठी म्हणत नाहीये, तर मी स्वतः माझ्या घरात आणि समाजात ते पाहिले आहे म्हणून म्हणत आहे. माझा साखरपुडा एका तरुणासोबत झाला होता.  अंतिम क्षणी त्याने माझी फसवणूक केली. माझ्या मनात बाळाची अपेक्षा होती… सर्व विधी देखील झालेल्या होत्या.’

‘मी माझे कपडे आणि दागिने खरेदी करण्यासाठी दिल्लीत गेलेली… अचानक मला त्याचा फोन आला आणि तो म्हणाला मला लग्न करायचं नाही. मी विचारलं का, तर त्याचं उत्तर होतं मला सायनसचं ऑपरेशन करायचं आहे. पण मला आजपर्यंत कळलं नाही की, लग्न का मोडलं आहे.’

‘मी सतत त्यांच्या आई – वडिलांना विचारत राहिली की काय होत आहे. पण त्यांनी देखील मला काहीही सांगितलं नाही. तो जवळपास सहा महिन्यांनंतर माझ्याकडे परत आला आणि म्हणाला की, मला तुझ्यासोबत लग्न करायतं आहे… तेव्हा मी त्याला लग्नासाठी नकार दिला…’ असं नीना गुप्ता म्हणाल्या.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...