AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षी सिन्हा हिने जहीर इक्बालसोबत लग्न केल्याने दोन्ही भाऊ नाराज? अखेर सत्य पुढे, मावस बहीण म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या आगामी चित्रपटासोबतच खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. अभिनेत्रीने जहीरसोबतच्या नात्यावर अत्यंत मोठा खुलासा केला. हेच नाही तर त्याच्या कुटुंबाबद्दल बोलतानाही सोनाक्षी दिसली.

सोनाक्षी सिन्हा हिने जहीर इक्बालसोबत लग्न केल्याने दोन्ही भाऊ नाराज? अखेर सत्य पुढे, मावस बहीण म्हणाली...
Sonakshi Sinha cousin Pooja Ruparel
| Updated on: Nov 09, 2025 | 2:10 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सोनाक्षीने काही वर्षे डेट केल्यानंतर जहीर इक्बालसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि एकच खळबळ उडाली. सोनाक्षी हिने अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये जहीर इक्बालसोबत सिव्हिल मॅरेज अगोदर केले आणि त्यानंतर धमाकेदार पार्टी केली. या पार्टीला जवळपास सर्वच बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. सोनाक्षी सिव्हिल मॅरेजवेळी सही करत होती, त्यावेळी तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि आई शेजारी उभे होते. सोनाक्षीच्या लग्नाला 16 महिने पूर्ण झाली आहेत. पती जहीर इक्बाल याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती कायमच शेअर करताना दिसते. सध्या सोनाक्षी तिच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे.

सोनाक्षी सिन्हा स्वत:च्याच लग्नात धमाल करताना दिसली. सोनाक्षीच्या लग्नात तिचे दोन्ही भाऊ उपस्थित नसल्याने विविध चर्चा रंगताना दिसल्या. हेच नाही तर तिच्या दोन्ही भावांचा या लग्नाला विरोध असल्याचे सांगितले जाते. आता यावर सोनाक्षीच्या मावस बहिणीने मोठा खुलासा केला. खरोखरच सोनाक्षीने जहीरसोबत लग्न केल्याने तिचे दोन्ही भाऊ लव आणि कुश नाराज होते का? यावर भाष्य केले.

पूजा रूपारेल ही सोनाक्षीची सख्खी मावस बहीण आहे. विशेष म्हणजे तिने काही चित्रपटांमध्येही काम केले. मात्र, त्यानंतर तिच्या आयुष्यात मोठी अनेक संकटे आली. तिला म्हणावे तसे यश बॉलिवूडमध्ये मिळाले नाही. अगदी कमी वयात तिचे वडील गेले आणि त्यानंतर तिच्या आईचेही निधन झाले.पूजा रूपारेलची आई आणि सोनाक्षीची आई दोघे बहिणी होत्या. पूजा रूपारेलच्या आईच्या निधनानंतर मावणी पूनम सिन्हा हिने मुलीसारखे प्रेम पूजाला दिले.

सोनाक्षी सिन्हाच्या बहिणीने नुकताच एक मुलाखत दिली. यादरम्यान तिला सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात लव आणि कुश खरोखरच नाराज होते का? यावर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर पूजाने भाष्य केले. पूजा म्हणाली की, मी गॉसिप करायला आलेली नाही. मी जहीरला भेटले आहे, तो मला भेटलेल्यांपैकी सर्वात मजेदार माणूस नक्कीच आहे. लव आणि सोनाक्षीने निकिता रॉय नावाच्या एका संपूर्ण चित्रपटात एकत्र काम केले. जर खरोखरच यांच्यामध्ये काही असते तर दोघांनी एकत्र काम केले असते का? ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र दिसले, असेही तिने म्हटले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...