
आजकाल अवयवदान करण्याचं प्रमाण फार वाढलं आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वजन अवयवदान करण्यात विश्वास ठेवताना दिसतात. आज (13 ऑगस्ट 2025 )जागतिक अवयवदान दिनानिमित्त बॉलिवूडपासून ते दक्षिणेपर्यंत सेलिब्रिटींनी त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर एका सुपरस्टारने त्याच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे दान केले.
हे सुपस्टार म्हणजे दक्षिणेतील पॉवरस्टार पुनीत राजकुमार. ज्यांचे 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. यानंतर, त्याच्या कुटुंबाने त्यांचे डोळे दान केले, ज्यामुळे दोन लोकांना दृष्टी मिळाली. यानंतर, कर्नाटकातील राजकुमारच्या अनेक चाहत्यांनी त्यांचा आदर्श ठेवत अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.
बॉलिवूडमध्येही ऐश्वर्या राय बच्चनने काही वर्षांपूर्वी डोळे दान करण्याचा संकल्प केला. तिने आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाला डोळे दान करण्याचा संकल्प केला आहे. ती म्हणाली, “माझे डोळे ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे आणि ते दान करून मी इतरांना दृष्टीची देणगी देऊ शकते.” तर अमिताभ बच्चन यांनीही त्यांचे डोळे आणि इतर अवयव दान करण्याचे वचन दिले आहे. अमिताभ बच्चन अनेकदा अवयव दानाबाबत जागरूकता मोहिमा राबवतात. ते लोकांना प्रेरित करतात. ते म्हणतात, “एक दान अनेकांचे जीव वाचवू शकते.” त्यामुळे त्यांनी देखील याबाबत निर्णय घेतला आहे.
अवयवदान करणाऱ्या स्टार्सच्या यादीत थलैवा रजनीकांत यांचाही समावेश आहे. त्यांनी त्यांच्या संपूर्ण शरीराचे अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे. रजनीकांत यांचा असा विश्वास आहे की, “मृत्यूनंतरही सेवा सुरूच राहिली पाहिजे आणि ती करण्याचा हा योग्य मार्ग आहे.” ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रानेही तिचे सर्व अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे. 2014 मध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानने त्याचे सर्व अवयव दान करण्याची घोषणा केली होती.
‘बजरंगी भाईजान’ फेम सलमान खानचेही नाव या यादीत आहे. स्टेम सेल डोनेशनबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी सलमानने त्याचा अस्थिमज्जा दान करण्याचा संकल्प केला आहे. आर माधवनने संपूर्ण शरीरदान करण्याचा निर्णय घेतला, तर कमल हासनने डोळ्यांपासून ते किडनीपर्यंत सर्व काही दान करण्याचे आश्वासन दिले. काजल अग्रवाल सारख्या स्टार्सचाही या यादीत समावेश आहे. अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्या नंदिता दास यांनी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सर्व अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे. जुही चावलानेही डोळे दान करण्याचा संकल्प केला आहे.