AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अत्यंत अश्लील’, नोरा फतेहीच्या या गाण्याने उडाली एकच खळबळ, डबल मीनिंग आणि ती स्टेप वादात, Video पाहून..

नोरा फतेही आणि संजय दत्तच्या ‘सरके चुनर तेरी सरके’ गाण्यावर वाद. डबल मीनिंग बोलांवर सोशल मीडियावर संताप.

'अत्यंत अश्लील', नोरा फतेहीच्या या गाण्याने उडाली एकच खळबळ, डबल मीनिंग आणि ती स्टेप वादात, Video पाहून..
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 16, 2026 | 7:36 PM
Share

Nora Fatehi New Song : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री नोरा फतेही यांचे नवीन गाणे सरके चुनर तेरी सरके नुकतेच प्रदर्शित झाले असून ते सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. हे गाणे प्रदर्शित होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असले तरी त्यातील शब्दांमुळे काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे गाणे ‘केडी: द डेविल’ या आगामी चित्रपटातील आहे. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. गाण्यात संजय दत्तचा खलनायकाचा अंदाज आणि नोरा फतेहीचा दमदार डान्स पाहायला मिळत आहे. जोशपूर्ण संगीत आणि आकर्षक नृत्यामुळे हे गाणे प्रेक्षकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे.

ती स्टेप चर्चेत

गाण्यात नोरा फतेही अनेक बॅकअप डान्सर्ससोबत डान्स करताना दिसते आहे. हे गाणे डान्स बारच्या सेटवर चित्रित करण्यात आले आहे. गाण्याच्या प्रोमोमध्ये नोरा फतेहीने घातलेला पारंपरिक घाघरा-चोलीच्या वेगळ्या स्टाइलमुळेही ती चर्चेत आली आहे. या गाण्यातील ‘हुक स्टेप’मुळेही ती चर्चेत आहे. त्या स्टेपमध्ये ती वारंवार तिचा पदर खाली सोडत पुन्हा उचलताना दिसत आहे.

गाण्याचा संपूर्ण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही सोशल मीडिया युजर्सनी गाण्यामधील ओळींवर आक्षेप घेतला आहे. अनेकांच्या मते गाण्याच्या सुरुवातीच्या ओळींमध्ये डबल मीनिंग शब्दांचा वापर करण्यात आला असून ते अश्लील वाटत आहे. त्यामुळे काही प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

सरके चुनर तेरी सरके या गाण्याचे बोल गीतकार रकीब आलम यांनी लिहिले असून त्याला संगीत अर्जुन जान्या यांनी दिले आहे. गाणे यूट्यूबवर प्रदर्शित होताच काही प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये तीव्र प्रतिक्रिया दिल्या.

नेटकऱ्यांच्या मिश्र प्रतिक्रिया

काही युजर्सनी अश्लीलतेची परिसीमा गाठली आहे अशी टीका केली आहे. तर काहींनी संजय दत्तच्या लूक आणि डान्सबद्दलही प्रश्न उपस्थित केले. काहींनी तर बॉलिवूड गाण्यांनी आता भोजपुरी गाण्यांनाही मागे टाकले असल्याची उपरोधिक टिप्पणी केली. इतकेच नाही तर काही सोशल मीडिया युजर्सनी या गाण्यावर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे.

दरम्यान, दुसरीकडे काही चाहत्यांनी मात्र नोरा फतेहीच्या डान्स मूव्ह्जचे आणि गाण्याच्या म्युझिकचे कौतुकही केले आहे. त्यामुळे या गाण्यावर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Follow Us
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच