AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali Gift : कंपनीने कर्मचाऱ्यांच्या डेस्कवर ठेवलं असं जबरदस्त दिवाळी गिफ्ट, पाहून व्हाल थक्क, सोशल मीडियावर चर्चा

Diwali Gift : दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट देतात. अशाच एका कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी अनोखं सरप्राइज ठेवलं.

Diwali Gift : कंपनीने कर्मचाऱ्यांच्या डेस्कवर ठेवलं असं जबरदस्त दिवाळी गिफ्ट, पाहून व्हाल थक्क, सोशल मीडियावर चर्चा
Diwali Gift
| Edited By: | Updated on: Nov 04, 2026 | 9:44 PM
Share

दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट देतात. अशाच एका कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी अनोखं सरप्राइज ठेवलं असून, त्यांच्या डेस्कवर ठेवलेलं गिफ्ट पाहून कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बसला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवाळीचा सण जवळ आला की ऑफिसमध्येही उत्साहाचे वातावरण असते. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खास भेटवस्तू देतात. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना मिठाई किंवा गिफ्ट हॅम्पर देतात, तर काही कंपन्या हटके भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करतात.

सध्या सोशल मीडियावर अशाच एका कंपनीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी ठेवलेलं दिवाळी गिफ्ट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कर्मचाऱ्यांच्या डेस्कवर ठेवले स्मार्टफोन

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका कंपनीचे ऑफिस दिसत आहे. ऑफिसमधील कर्मचाऱ्यांच्या डेस्कवर वेगवेगळ्या रंगांचे स्मार्टफोनचे बॉक्स ठेवण्यात आले आहेत. दिवाळीनिमित्त कंपनीने कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन भेट देण्याचे ठरवले होते. त्यामुळे ऑफिसमध्ये येताच डेस्कवर ठेवलेले हे गिफ्ट पाहून कर्मचारी आश्चर्यचकित झाले.

गिफ्ट पाहून कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेना

डेस्कवर ठेवलेले गिफ्ट पाहिल्यानंतर सर्व कर्मचारी एकत्र आले आणि त्यांनी त्याचा व्हिडीओ बनवला. यावेळी प्रत्येक कर्मचारी आपल्याला दिवाळी भेट म्हणून मिळालेला स्मार्टफोन दाखवताना दिसत आहे. कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे. यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी खास ठरणार असल्याचे या व्हिडीओतून दिसते.

नेटकऱ्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

हा व्हिडीओ ‘financersaab2.0’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, “छान आहे, आम्हाला तर फक्त सोनपापडी मिळाली,” अशी कमेंट केली. तर दुसऱ्या युजरने कंपनीने बोनस कापून १५ हजार रुपयांचा फोन दिला असावा, असा टोमणा मारला. आणखी एका युजरने कंपनी बोनस देत नसेल, तर अशा भेटवस्तू देऊन कर्मचाऱ्यांचे मन रमवले जात असावे, अशी प्रतिक्रिया दिली.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल