करोडोंचा बंगला, घरासमोर अलिशान गाड्यांची रांग, जाणून घ्या फरहान अख्तरच्या संपत्तीविषयी…

| Updated on: Feb 24, 2022 | 11:05 AM

फरहानची संपत्ती कोट्यावधींची आहे. मुंबईतील वाद्र्यातील बंगला,खंडाळ्यातील सुकून आणि अलिशान गाड्यांचा समावेश आहे. चला तर मग फरहान खानच्या संपत्तीविषयी जाणून घेऊयात...

करोडोंचा बंगला, घरासमोर अलिशान गाड्यांची रांग, जाणून घ्या फरहान अख्तरच्या संपत्तीविषयी...
फरहान आणि शिबानी
Follow us on

आयेशा सय्यद, मुंबई : अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) सध्या चर्चेत आहे. फरहान आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाला त्यांचे कुटुंबीय (Farhan And Shibani Wedding) आणि त्याच्याजवळची मित्रमंडळी उपस्थित होते. फरहान आणि शिबानी यांनी खंडाळ्यातील त्यांच्या फार्म हाऊसवर लग्नगाठ बांधली. या शाही लग्नानंतर अख्तर फॅमिलीच्या संपत्तीविषयी चर्चा होऊ लागली. फरहानची संपत्ती कोट्यावधींची आहे. यात मुंबईतील वाद्र्यातील बंगला,खंडाळ्यातील सुकून आणि अलिशान गाड्यांचा समावेश आहे. चला तर मग फरहान खानच्या संपत्तीविषयी जाणून घेऊयात…

फरहान अख्तर संपत्ती

फरहान अख्तर याची संपत्ती करोडोंच्या घरात आहे. मुंबईतील वांद्रे भागात शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याशेजारी फरहानचा बंगला आहे. या 10 हजार स्वेअर फूटच्या या बंगल्याची किंमत 35 कोटी रूपये इतकी आहे. तसंच अख्तर कुटुंबाचा खंडाळ्यात सुकून नावाचं फार्म हाऊस आहे याची किंमतही कोटींच्या घरात आहे. इथंच फरहान आणि शिबानी यांनी लग्न केलं. त्याच्याकडे अलिशान गाड्यादेखील आहेत. पोर्श कंपनीची केमॅन ही फरहानची गाडी दीड कोटी किमतीची आहे. या शिवाय लॅन्ड रोव्हर, मर्सिडीज या सारख्या गाड्याही फरहान वापरतो.

फरहान आणि शिबानी यांनी नुकतंच लग्न केलं. या लग्नसमारंभात ऋतिक रोशन, राकेश रोशन, आशुतोष गोवारीकर, सतीश शहा, रिया, रितेश सिधवानी, मेयांग चांग यांच्याबरोबर अनेक दिग्गज या लग्नात सहभागी झाले होते.

फरहान अख्तरचं करिअर

फरहान अख्तरच्या प्रमुख चित्रपटांबद्दल बोलायचे तर, त्याने ‘दिल चाहता है’, ‘लक्ष्य’, ‘डॉन’, ‘डॉन 2’ यांसारख्या चित्रपटांमध्ये लेखनाचे काम केले आहे. याशिवाय त्याने ‘डॉन’, ‘रॉक ऑन’, ‘लक बाय चान्स’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करत दिग्दर्शकाची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर फरहानने ‘रॉक ऑन’, ‘लक बाय चान्स’, ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘मिल्खा सिंग’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे.लग्नानंतर फरहान दीर्घ कालाखंडानंतर जी ले जरा या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह तो सगळ्यांच्या भेटीला येत आहे.

संबंधित बातम्या

‘पुष्पा’पेक्षा जास्त प्रेम ‘पावनखिंड’वर करणं हे मराठी माणसाचं कर्तव्य; चित्रपट पाहणाऱ्यांना मिसळवर डिस्काऊंट

‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीने सोडली मालिका? नव्या मालिकेत साकारणार नवी भूमिका

…जेव्हा देवानंदनं इम्रान खानला बॉलिवूडची ऑफर दिली!