Amitabh Bachchan Health Update : अमिताभ यांची सलग दुसऱ्या दिवशी पोस्ट, चाहते… हेल्थ अपडेट काय?

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सोशल मीडियातून ब्रेक घेतला आहे. दसऱ्याला केलेल्या पोस्टनंतर त्यांनी दुसऱ्या दिवशीही आरोग्याची अपडेट दिली, ज्यात 'अजून विश्रांतीची गरज' असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांमध्ये चिंता आहे. शरीर अधिक आराम मागत असल्याचे ते म्हणाले.

Amitabh Bachchan Health Update : अमिताभ यांची सलग दुसऱ्या दिवशी पोस्ट, चाहते... हेल्थ अपडेट काय?
amitabh bachchan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 24, 2026 | 1:27 PM

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी नुकतीच सोशल मीडियावरून आपण ब्रेक घेत असल्याची मोठी घोषणा केली होती. दसऱ्याच्या निमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली होती. डॉक्टरांनी आपल्याला सक्तीचा आराम करायला सांगितलं असून रिकव्हर व्हायला सांगितलं आहे. त्यामुळे मी काही दिवस सोशल मीडियावर सक्रिय राहणार नाही, असं अमिताभ यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या पोस्टमुळे त्यांचे चाहते त्रस्त झाले होते. अमिताभ यांना नेमकं झालं तरी काय? अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी अमिताभ यांनी त्यांची हेल्थ अपडेट दिली आहे. मला अजून विश्रांतीची गरज आहे, असं अमिताभ यांनी म्हटलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी एक्सवरून ब्रेक घेत असल्याचं म्हटलं होतं. आता टम्बलर ब्लॉगवर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. माणसाचं शरीर खूपच वेगळं असतं. त्याला अजून अधिक विश्रांती हवी आहे, असं अमिताभ यांनी या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. अमिताभ यांची प्रकृती चांगली आहे. मात्र, डॉक्टरांनी त्यांना थोडा अधिक आराम करायला सांगितलं आहे.

Loading...

ब्लॉगवरून दिली ब्रेकची माहिती

अमिताभ बच्चन यांनी बुधवारी ब्लॉगवरून त्यांच्या आरोग्याबाबतची पोस्ट शेअर केली होती. त्याकडे अनेकांचं लक्ष वेधलं होतं. डॉक्टरांनी आराम करण्याचा आणि बरे होण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळेच मी सोशल मीडियावरून थोडा ब्रेक घेत आहे, असं म्हटल्यावर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी नवीन पोस्ट करून हेल्थची अपडेट दिली. अजून आणखी आरामाची गरज आहे. मी स्वतःला घडवत आहे आणि मानवी शरीर किती वेगळे आहे आणि त्याची वैशिष्ट्यपूर्ण गुणवैशिष्ट्ये किती अनोखी आहेत, याबद्दल विचारमंथन करत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, अमिताभ यांनी आपल्या चाहत्यांची माफीही मागितली होती. मी तुमच्या संपर्कात राहणार नाही. त्यामुळे मी तुमची माफी मागतो. मी सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी असमर्थ आहे. माझी मजबुरी समजून घ्याल, असं अमिताभ यांनी म्हटलं होतं.

शुटिंगवेळी लागला मार

दरम्यान, अमिताभ बच्चन यांना ‘कौन बनेगा करोड़पति 18’ च्या शोवर मार लागला होता. या महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांनी चाहत्यांना याची माहिती दिली होती. शुटिंग करताना त्यांचा पाय घसरला आणि गुडघ्याला मार लागला होता. शोच्या सुरुवातीला ते होस्ट करताना दिसत होते. मला उभं राहायला त्रास होत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, ही जखम झाल्याने त्यांना आराम करावा लागतोय की त्यामागे वेगळं कारण आहे हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलं नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us