AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange : तर भाजप संपुष्टात येऊ शकतो… मनोज जरांगेंचा मोठा इशारा; थेट पंतप्रधानांकडे…

ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असताना, मनोज जरांगे पाटील यांनी भाजपला मोठा इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांच्यात परस्पर हे घडत असेल तर महाराष्ट्रात भाजप संपुष्टात येईल, असा दावा जरांगेंनी केला. या गंभीर प्रकरणात मोदींनी लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी केले.

Manoj Jarange : तर भाजप संपुष्टात येऊ शकतो... मनोज जरांगेंचा मोठा इशारा; थेट पंतप्रधानांकडे...
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 24, 2026 | 1:16 PM
Share

रामनाथ ढाकणे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : एका ऑडिओ क्लिपमुळे सध्या महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. या क्लिपवरून भाजप आणि शिंदे गटात जुंपलेली आहे. त्यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झालेला असतानाच भाजपचा एक नेता दिल्लीला गेला आहे. हा नेता अचानक दिल्लीला गेल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यावर आता थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परस्पर षडयंत्र होत असतील तर भाजप महाराष्ट्रातून संपू शकतो, असा दावाच मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यावेळी त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचं साकडंही पंतप्रधानांना घातलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

ऑडिओ क्लिपचं प्रकरण बाहेर आलेलं असतानाच भाजपचे नेते प्रवीण दरेकर हे दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा विषय गंभीर आहे. यात मोदींनी लक्ष घालावं. नाही तर भाजप शंभर टक्के महाराष्ट्रात संपुष्टात येऊ शकतो. फडणवीस आणि मोदींच्या परस्पर पडद्यामागे हे सुरू असेल तर भयंकर आहे. ही विचारधारा देशाला परवडणारी नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मोदींना साकडं

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणाच्या मुळाशी जातील असा माझा त्यांच्यावर विश्वास आहे. ते जर प्रकरणाच्या मुळाशी नाही गेले तर हे तुम्हीच घडवून आणल्याचा आरोप करेन. देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापना केली असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीची यंत्रणा या मागे लावली पाहिजे. चौकशी करणाऱ्यांमध्ये आयएएस आयपीएस दर्जाचे अधिकारी आणि न्यायाधीश असावेत. राजकारणाला न शिवणारी यंत्रणा चौकशीत असली पाहिजे, असं सांगतानाच आता दिल्लीच्या वाऱ्या सुरू होतील. त्यानंतर काही दिवसाने दोन्ही मिळून माझ्या मागे लागतील. पडद्यामागची चर्चा दाबण्यासाठी ते सत्तेकडेच झुकतील, असा दावाही जरांगे यांनी केला.

कदमांकडे क्लिप आली कुठून?

मी क्लिप ऐकवण्याच्या आधीच रामदास कदम यांच्याकडे क्लिप कुठून आली? त्यांच्याकडे संपूर्ण क्लिप आहे. त्यांना ती कुणी दिली? त्यांची नावे त्यांना माहीत आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. मी संपूर्ण क्लिप ऐकवली. रामदास कदम यांनी फक्त शिंदेंचीच बदनामी करणारी क्लिप कशी वाजवली? असा सवाल करतानाच शिंदेंना कोण संपवतंय? असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...
एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं....
Manoj Jarange On Viral Clip : एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं; जरांगेंचा दावा, महायुतीत पुन्हा खळबळ
हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला
Prasad Lad On Sanjay Raut : हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला; ऑडिओ क्लिपवरून राजकीय घमासान
500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Jarnage Viral Audio Clip : 500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या..
Pankaj Bhoyar : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या आरोपांमागचं सत्य लवकरच समोर येणार?
तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू...; प्रवीण दरेकरांचा सूचक इशारा
Pravin Darekar On Ramdas Kadam : तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू....; प्रवीण दरेकरांचा रामदास कदमांना सूचक इशारा
मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; AQI तब्बल....
Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; दादर चौपाटीवर दृश्यमानता घटली, AQI तब्बल....
जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल
Mangesh Sasane : मनोज जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल, नेमकं प्रकरण काय?