मुस्लीम अभिनेत्रीने केलं हिंदू निर्मात्याशी लग्न; बॉलिवूडमध्ये ठरली फ्लॉप तरीही ती हिट अभिनेत्री

एका रूढीवादी मुस्लिम कुटुंबातून आलेल्या अभिनेत्रीने हिंदू निर्मात्याशी लग्न केलं. आता ती पूर्णपणे हिंदू रितीरिवाजाचं पालन करते. ती बॉलिवूडमध्ये जरी फ्लॉप ठरली असली तरीही ती एक हीट अभिनेत्री आहे.

मुस्लीम अभिनेत्रीने केलं हिंदू निर्मात्याशी लग्न; बॉलिवूडमध्ये ठरली फ्लॉप तरीही ती हिट अभिनेत्री
Amna Sharif,
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 10, 2025 | 2:51 PM

हिंदी चित्रपट असो किंवा टीव्ही इंडस्ट्री. कलाकारांचे अफेअर, त्यांचे लग्न किंवा घटस्फोट याची चर्चा कायम होत असते. अशीच एक अभिनेत्री आहे जिची चर्चा झाली होती जेव्हा तिने हिंदू निर्मात्याशी लग्न केलं होतं. या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र ती यशस्वी झाली नाही. आणि तिला एक फ्लॉप अभिनेत्री म्हणून टॅग मिळाला. नंतर या अभिनेत्रीने नशीब आजमावलं ते टीव्ही इंडस्ट्रीमध्ये. आणि तिला तिथे अपेक्षित असं यश मिळालं.

हिंदू रीतिरिवाजांचं करते पालन

ही अभिनेत्री मुस्लीम कुटुंबातून आली आहे परंतु तिने हिंदू कुटुंबात लग्न केले आणि आता ती हिंदू रीतिरिवाजांचं पालन करत आहे. ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये जरी फ्लॉप ठरली असली तरी ती तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाईलमुळे खूप लोकप्रिय आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘कसौटी जिंदगी की’ मध्ये कोमोलिकाची भूमिका साकारणारी आमना शरीफ आहे. आमनाचा जन्म 16 जुलै 1982 रोजी झाला. तिचे वडील भारतीय आहेत आणि आई पारसी-बहरैनी आहे. आमनाने स्वतः तिचे शिक्षण वांद्रे येथून पूर्ण केले.

मॉडेलिंग आणि जाहिरातींसाठी अनेक ऑफर येऊ लागल्या

आमना शरीफ कॉलेजमध्ये शिकत असताना तिला मॉडेलिंग आणि जाहिरातींसाठी अनेक ऑफर येऊ लागल्या. अशाप्रकारे आमनाने तिच्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली.आमना शरीफने एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सच्या ‘कहीं तो होगा’ या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले. या मालिकेसाठी एकता कपूरला एक नवीन चेहरा हवा होता. जेव्हा तिने आमनाचे ऑडिशन पाहिले तेव्हा ती प्रभावित झाली आणि तिला कास्ट केले. या शोमध्ये आमना आणि राजीव खंडेलवाल दिसले.

चित्रपटांमधील तिची कारकीर्द यशस्वी होऊ शकली नाही

एकता कपूरच्या मालिकेपूर्वी तिने 2002 मध्ये जंक्शन नावाचा तमिळ चित्रपट केला होता. तथापि, हा चित्रपट फार काही कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर ती आलू चाट, आओ विश करे आणि एक व्हिलन सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. परंतु चित्रपटांमधील तिची कारकीर्द यशस्वी होऊ शकली नाही.आमनाने टीव्हीवर आपला ठसा उमटवला होता. ‘कहीं तो होगा’च्या यशानंतर, ती कुमकुम, काव्यांजली, करम अपना अपना, होगा जुडा ना हम आणि एक थी नायक मध्ये दिसली. मात्र, कसौटी जिंदगी की 2 मधील तिच्या नकारात्मक भूमिकेने ती प्रसिद्ध झाली.


मोठ्या कष्टाने तिने तिच्या कुटुंबाचे मन वळवले

2013 मध्ये आमना शरीफने 27 डिसेंबर 2013 रोजी निर्माता अमित कपूरशी लग्न केलं. हे लग्न हिंदू रितीरिवाजांनुसार पार पडले. ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली आणि तिच्या केसांमध्ये सिंदूर होता. लग्नात संजीदा शेख, करणवीर बोहरा, मौनी रॉय आणि शेफाली जरीवाला यांच्यासह अनेक स्टार्स दिसले. आता आमना शरीफला एक मुलगा देखील आहे.2022 मध्ये, आमना शरीफने एका मुलाखतीत सांगितले की ती एका रूढीवादी मुस्लिम कुटुंबातून येते. तिच्या कुटुंबाला कधीच तिने अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये यावे असे वाटत नव्हते. अशा परिस्थितीत तिला नेहमीच आव्हानांचा सामना करावा लागला आहे. मोठ्या कष्टाने तिने तिच्या कुटुंबाचे तिच्या करिअरसाठी मन वळवलं.