AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jeffrey Epstein Files : जेफ्री एपस्टिनच्या रेड रुममध्ये काय घडायचं ? जगातील सर्वात सुंदर तरुणी…

जेफरी एपस्टिनच्या 'रेड रुम'चे भयानक सत्य समोर आले आहे, जिथे त्याने जगभरातील उद्योगपती, राजकारणी आणि देशांच्या प्रमुखांसाठी तरुणी पुरवण्याचे गुन्हे केले. पॅरिसमधील त्याच्या अलिशान फ्लॅटमधील ही गुप्त खोली बाललैंगिक गुन्हे आणि नग्न नृत्याचे केंद्र होती. नुकत्याच समोर आलेल्या फाईल्समुळे अनेक बड्या हस्तींची नावे उघड झाली असून, यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

Jeffrey Epstein Files : जेफ्री एपस्टिनच्या रेड रुममध्ये काय घडायचं ? जगातील सर्वात सुंदर तरुणी...
जेफ्री एपस्टीन
| Updated on: Feb 10, 2026 | 3:38 PM
Share

Jeffrey Epstein Files : जेफ्री एपस्टिनच्या फाईलने अख्खं जग हादरलं आहे. या फाईल्समध्ये जगभरातील बड्या हस्तींचं नाव आलं आहे. जेफ्री एपस्टिन हा जगातील बड्या हस्तींना तरुणी पुरवायचं काम करायचा. त्यात उद्योगपती, राजकारणी, एवढंच नव्हे तर काही देशांचे प्रमुखही होते. या फाईल्स ओपन होताच जगात एकच खळबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी तर राजीनाम्यांची मागणीही होत आहे. काही ठिकाणी तर राजीनामे देण्यास सुरुवात झाली आहे. जेफ्री एपस्टिनने हे कारनामे करण्यासाठी एक आयलँड तयार केलं होतं. तिथे त्याच्या रेड रुममध्ये हे काळेधंदे चालायचे.

जेफ्री एपस्टाईनच्या अत्यंत डेंजर अशा रेड रूमचा पर्दाफाश झाला आहे. त्याने आपल्या विकृत कामांसाठी रेड रूम तयार केली होती. या खोलीत स्त्रिया एपस्टिनच्या श्रीमंत पाहुण्यांसाठी खासगी नृत्य सादर करायच्या, आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जायचे. बाल-लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टिनची ही रेड रुम पॅरिसमधील त्याच्या एका घरात उभारण्यात आली होती.

लाल खोलीत काय चालू होते?

गुप्त रेड रूममध्ये महिलांना खासगी नृत्य करताना पाहिले गेले. एका माध्यमांच्या अहवालानुसार, पीटर मँडेलसन यांचा अंतर्वस्त्रातील फोटो त्या फ्लॅटमध्ये काढण्यात आला, जो अत्यंत अश्लील होता, त्यामुळे खळबळ उडाली होती. जेफ्री एपस्टिनच्या पॅरिसमधील फ्लॅटमध्ये एक रेड रूम होती. हा फ्लॅट ‘पापांचा घर’ म्हणून ओळखला जात असे. अगदी प्रतिष्ठित महिला देखील या गुप्त खोलीत नग्न नृत्य करताना दिसल्या. इथेच एपस्टिनने सर्वात भयंकर लैंगिक गुन्हे घडवून आणले.

हा आलिशान फ्लॅट पॅरिसमधील आर्क द ट्रायम्फजवळ स्थित आहे. इथे त्याने अनेक घृणास्पद कृत्ये केली. इथेच एपस्टिन अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसरसारख्या लोकांचे मनोरंजन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करायचा. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या लॉ विभागाने काही व्हिडीओ जारी केली. त्यातत एपस्टिन हा या रेड रूममध्ये दिसत आहे.

कसा असायचा डान्स ?

या व्हिडिओंमध्ये नाचणाऱ्या महिलांचे चेहरे धूसर आहेत. त्यामुळे त्यांचं वय कळून येत नाही. पण, पीटर मँडेलसन यांना याच खोल्यांमध्ये फक्त अंतर्वस्त्रात पाहिले गेले होते. अनेक महिलांही खूपच कमी कपडे घातलेल्या दिसल्या. त्या या आलिशान अपार्टमेंटमध्ये डान्स करताना कपडे काढताना दिसतात. या रेड रूममधील हे व्हिडिओ वेगवेगळ्या तारखांना शूट करण्यात आले होते, असं सांगितलं जातं. त्यामुळे या रेड रुममध्ये रोज नंगानाच असायचा हे स्पष्ट होतं.

फ्लॅटचे काय झाले ?

गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये मेंडेलसन एका महिलेशी बोलताना दिसत आहे. 2003 आणि 2004 मधील बँकेच्या स्टेटमेंट्समध्ये असे उघड झाले की, त्याला एपस्टिनकडून एकूण 75,000 अमेरिकन डॉलर मिळाले होते, आणि असेही म्हटले जाते की, एपस्टिनने मेंडेलसनच्या इतर काही खर्चांचीही भरपाई केली होती. मँडेलसनने दावा केला की, त्याला आठवत नाही की त्या फ्लॅटमध्ये तो अंतर्वस्त्रे घालून का फोटो काढला गेला होता. एपस्टिनच्या पॅरिसमधील फ्लॅटचे खरेदीदाराचे नाव बुल्गेरियाई प्लास्टिक पॅकेजिंग उद्योजक जॉर्जी तुचेव असून त्याने ते 8.2 दशलक्ष डॉलरला हा फ्लॅट खरेदी केलाय.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...