Video : ‘बिग बॉस 14’ विजेत्या रुबीनाच्या दिलखेचक अदा, सोशल मीडियावर डान्स व्हिडीओची चर्चा!

Video : 'बिग बॉस 14' विजेत्या रुबीनाच्या दिलखेचक अदा, सोशल मीडियावर डान्स व्हिडीओची चर्चा!

बिग बॉस 14 (Bigg Boss 14)ची विजेती ठरलेली रुबीना दिलैकचा एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 27, 2021 | 11:42 AM

मुंबई :बिग बॉस 14′ (Bigg Boss 14)ची विजेती ठरलेली रुबीना दिलैकचा एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रुबीना आणि अभिनव डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ रुबीनाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Bigg Boss 14 winner Rubina Dilaik’s dance video goes viral on social media)

रुबीना आणि अभिनव यांच्या चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून त्यांनी याचे काैतुक केले आहे. चाहत्यांनी बिग बॉस 14 चा विजेता कोण होणार? हे शोधण्याचा प्रयत्न गुगलवर केला, त्यावेळी गुगलवर रुबीना दिलैकचे नाव येत होते, म्हणजेच जरी बिग बॉस 14 ची विजेती म्हणून बिग बॉसने रुबीनाच्या नावाची घोषणा केली असली तरी देखील गुगलने बिग बॉस 14 च्या विजेत्याची घोषणा आधीच केली होती.

केवळ गुगलच नाही, तर बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनाही वाटतं होते की, बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक होणार, रुबीना दिलैक, तिचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्ला समवेत बिग बॉस सीझन 14 मध्ये दाखल झाली होती. रुबीनाने आपल्या करिअरची सुरूवात छोटी बहू मालिकेपासून केली होती, त्या मालिकेत रूबीनाची भूमिका अगदी साधी होती. 2012 मध्ये रुबीना सास बिना ससुराल या मालिकेत दिसली होती.

त्यानंतर 2013 में वो पुनर्विवाह या मालिकेत देखील दिसली होती. 2016 मध्ये रूबीनाला एक अशी मालिका मिळाली की, त्यानंतर रुबीना चर्चेत आली शक्ति-अस्तित्व के एहसास की ही मालिका प्रचंड गाजली यामध्ये रुबीना एका तृतीयपंथीच्या भूमिकेमध्ये होती. 2018 मध्ये रुबीनाने अभिनेता अभिनव शुक्लासोबत लग्न केले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

संबंधित बातम्या : 

अनुराग कश्यपच्या लेकीलाही बलात्काराच्या धमक्या; आलियाने इन्स्टावरून केला गौप्यस्फोट

Video : राखी सावंतच्या मदतीला धावून गेला सोहेल खान, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

आई अमृतासह सारा अली खान पोहोचली अजमेर शरीफला, पाहा माय-लेकींचे फोटो!

(Bigg Boss 14 winner Rubina Dilaik’s dance video goes viral on social media)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें