अनुराग कश्यपच्या लेकीलाही बलात्काराच्या धमक्या; आलियाने इन्स्टावरून केला गौप्यस्फोट

अनुराग कश्यपच्या लेकीलाही बलात्काराच्या धमक्या; आलियाने इन्स्टावरून केला गौप्यस्फोट

दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांची मुलगी आलिया कश्यपचे (Aaliya Kashyap ) नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 27, 2021 | 10:12 AM

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांची मुलगी आलिया कश्यपचे (Aaliya Kashyap ) नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. आलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मध्यंतरी तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तिच्या त्या फोटोंना घाणेरड्या कमेंट्स केल्या जात होत्या. (Aaliya Kashyap shared the post on social media)

त्यानंतर आता आलियाने एक खुसाला केला आहे तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये आलिया म्हणते आहे की, एका ब्रँडसाठी लाँजरी शूटनंतर  बलात्काराच्या धमक्या आणि खालच्या थराच्या ट्रोलिंगला सामोरे जाण्याची वेळ माझ्यावर आली होती. या सर्वांमध्ये मी ऐवढी घाबरली होती की, सोशल मीडियावरील अकाऊंट बंद करण्याचा विचार केला होता.

आलिया पुढे म्हणाली की, मी आजपर्यंत कधीच एवढी घाबरले देखील नव्हते. गेल्या काही आठवड्यांपासून माझी मनस्थिती देखील ठीक नाही. मी बऱ्याच वेळा ठरवले होते की, यासर्व प्रकरणावर बोलले पाहिजे. काही दिवसांपूर्वी अनुराग कश्यपला लेक आलियाच्या बॉलिवूडमधील एन्ट्रीच्या प्रश्नावर विचारले गेले होते त्यावेळी अनुराग कश्यप म्हणाला, “ती आणखी छोटी आहे. ती स्वत: ठरवेल की तिला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचंय.

अजून आलियाला खूप काही शिकायचंय… असं होत नाही की एक दिवस म्हणाली मला अभिनेत्री व्हायचंय आणि दुसऱ्या दिवशी ती अभिनेत्री झाली.. त्यासाठी भरपूर मेहनतीची गरज असते जर तिला अॅक्टिंग करायची असेल तर तिला आधी अॅक्टिंगचे धडे गिरवावे लागतील. त्यासाठी तिला स्ट्रगल करावा लागेल. काही ठिकाणी ऑडिशन द्याव्या लागतील. ज्या मेहनतीच्या जोरावर पास कराव्या लागतील. मला वाटतं नाही की मी ज्या प्रकारच्या फिल्मस बनवतो त्यासाठी आलिया बरोबर असेल”, असं उत्तर अनुरागने काही दिवसांपूर्वी दिलं होतं.

संबंधित बातम्या : 

Video : राखी सावंतच्या मदतीला धावून गेला सोहेल खान, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

आई अमृतासह सारा अली खान पोहोचली अजमेर शरीफला, पाहा माय-लेकींचे फोटो!

अभिनेत्री लिसा हेडनने बेबी बंपसोबत केला जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

(Aaliya Kashyap shared the post on social media)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें