
आयेशा सय्यद, मुंबई : गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi Movie) हा सिनेमा उद्या प्रदर्शित होतोय. त्याआधी काल संध्याकाळी या चित्रपटाचं स्क्रिनिंग होतं. या स्क्रिनिंगला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेता विकी कौशलही ( Vicky Kaushal) यावेळी उपस्थित होता. त्याने स्क्रिनिंगनंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विकीने आपल्या इन्स्टाग्रामवर याविषयीची स्टोरी शेअर केली आहे. “हा चित्रपट पाहून मला सुखद धक्का बसला. संजय लीला भन्साळी सर हे मास्टर आहेत. आलिया भट्टला आपल्याबद्दल काय बोलावं कळत नाहीये. आलियाने गंगूबाईचं पात्र उत्तमप्रकारे साकारलं आहे. तिच्या अभिनयाबद्दल काय बोलू शब्द अपुरे आहेत. हा खूप खास सिनेमा आहे, सगळ्यांनी पाहावा असा हा सिनेमा आहे”, असं विकी कौशल म्हणाला आहे.
विकी कौशलची इन्स्टाग्राम पोस्ट
गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा उद्या प्रदर्शित होतोय. या सिनेमाबद्दल विकी कौशलने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “हा चित्रपट पाहून मला सुखद धक्का बसला. संजय लीला भन्साळी सर हे मास्टर आहेत. आलिया भट्टला आपल्याबद्दल काय बोलावं कळत नाहीये. आलियाने गंगूबाईचं पात्र उत्तमप्रकारे साकारलं आहे. तिच्या अभिनयाबद्दल काय बोलू शब्द अपुरे आहेत. हा खूप खास सिनेमा आहे, सगळ्यांनी पाहावा असा हा सिनेमा आहे”, असं विकी कौशल म्हणाला आहे.
चित्रपट उद्या रिलीज होणार
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट चर्चेत आहे. या आधी हा सिनेमा 6 जानेवारी प्रदर्शित होणार होता मात्र आता हा चित्रपट 25 फेब्रुवारीला म्हणजे उद्या प्रदर्शित होणार आहे.
भन्साळींच्या ‘गंगूबाई…’मागे वादांचा ससेमिरा
‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटावरून अनेक वाद निर्माण झाले आहेत. याआधी खुद्द गंगूबाई यांच्या मुलाने देखील या चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला होता. गंगूबाई यांचे पुत्र बाबूजी रावजी शाह यांनी आलिया भट्ट, संजय लीला भन्साळी आणि प्रख्यात लेखक हुसेन झैदी यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. गंगूबाईच्या मुलाने असे म्हटले की, हुसेन झैदी यांच्या पुस्तकाचे काही भाग त्यांचे वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणारे असून, यामुळे कुटुंबाची बदनामी होऊ शकते. त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण त्वरित थांबवावे आणि पुस्तकातील काही आक्षेपार्ह भाग चित्रपटाच्या कथेतून वगळावेत, अशी त्यांची इच्छा आहे. बाबूजी रावजी शाह म्हणाले की, जेव्हापासून चित्रपटाची घोषणा झाली आहे, तेव्हापासून स्थानिक लोकांकडून त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय एका वाईट कुटुंबातील म्हणून त्यांना हिणवले जात आहे. तसेच यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
संबंधित बातम्या