AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर ‘ब्रह्मास्त्र’मधील आलियाचा फर्स्ट लूक आला समोर; वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली खास भेट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट हिचा आज 29 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आलियाने स्वत:ला आणि तिच्या चाहत्यांना एक गोड गिफ्ट दिलंय. आलियाचा आगामी ब्रह्मास्त्र या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

अखेर 'ब्रह्मास्त्र'मधील आलियाचा फर्स्ट लूक आला समोर; वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली खास भेट
आलिया भट- ब्रह्मास्त्र सिनेमाImage Credit source: यूट्यूब
| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 2:37 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) हिचा आज 29 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आलियाने स्वत:ला आणि तिच्या चाहत्यांना एक गोड गिफ्ट दिलंय. आलियाचा आगामी ब्रह्मास्त्र (Bhramhastra) या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे. आयान मुखर्जी (Ayan Mukharji) दिग्दर्शित या चित्रपटात आलियाची मुख्य भूमिका असणार आहे. आलियाच्या वाढदिवशीच या सिनेमातील तिचा लूक रिव्हील झाल्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छांसह या सिनेमासाठीही बेस्ट विशेस् मिळत आहेत. याचा व्हीडिओ आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हीडिओला तिने दिलेलं कॅप्शनही तितकंच खास आहे.

आलिया भटचा ब्रह्मास्त्रमधला लूक

ब्रह्मास्त्र सिनेमातील आलियाचा फस्ट लूक रिव्हील झाला आहे. यात अक पाण्याचा थेंब गरगरत येतो आणि आलियाच्या डोळ्यात पडतो, असा सिन दाखवण्यात आला आहे. तसंच आलियाचे वेगवेगळ्या लूक यामध्ये पहायला मिळतात. यात आलिया साडी, वनपीस अश्या वेगवेगळ्या लूकमध्ये पहायला मिळतेय.

आलिया भटची पोस्ट

आलियाने ब्रह्मास्त्रमधल्या तिच्या लूकचा व्हीडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याला तिने “हॅप्पी बर्थ डे टू मी! यापेक्षा चांगलं बर्थ डे गिफ्ट काय असू शकतं? आयान मुखर्जी लव्ह यू आणि थँक्यू”, असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी तिला वाढदिवसाच्या आणि सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

आलियाच्या या नव्या लूकवर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. “आलिया तू या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तुला या सिनेमासाठी शुभेच्छा”, असं एकाने म्हटलंय. तर दुसऱ्याने “तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!”,असं म्हटलंय. तिसऱ्याने “आलियाचा रोल पॉवरफुल वाटतोय. हा सिनेमा पाहण्यास मी उत्सुक आहे”, असं म्हटलंय. “आलियाच लूक कड्डक असल्याचं म्हणत मी या सिनेमाची खूप मनापासून वाट बघतोय”, असं आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय.

संबंधित बातम्या

“ज्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तेच आता..”; ‘द काश्मीर फाईल्स’विषयी मोदींचं वक्तव्य

The Kashmir Files: प्रदर्शनाच्या एक दिवस आधी ‘द काश्मीर फाईल्स’मधील ‘या’ सीनवर लागली कात्री

‘मन सुन्न झालंय, डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत..’; प्राजक्ता गायकवाडची भावूक पोस्ट

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.