AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kashmir Files: प्रदर्शनाच्या एक दिवस आधी ‘द काश्मीर फाईल्स’मधील ‘या’ सीनवर लागली कात्री

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट 11 मार्च रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाला काही अडचणींचा सामना करावा लागला. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी यातील एका दृश्यावर कात्री लावण्याचे आदेश कोर्टाने दिले.

The Kashmir Files: प्रदर्शनाच्या एक दिवस आधी 'द काश्मीर फाईल्स'मधील 'या' सीनवर लागली कात्री
The Kashmir FilesImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 15, 2022 | 1:17 PM
Share

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट 11 मार्च रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाला काही अडचणींचा सामना करावा लागला. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी यातील एका दृश्यावर कात्री लावण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यामुळे गुरुवारी म्हणजेच 10 मार्च रोजी निर्मात्यांना चित्रपटातून दिवंगत आईएएफ स्क्वाड्रन लीडर रवी खन्ना (Sqn Ldr Ravi Khanna) यांच्यावर आधारित दृश्यांना काढून टाकावं लागलं. जम्मू-काश्मीर कोर्टाने यासंदर्भातील आदेश दिले होते. अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती यांसोबतच इतरही नामवंत कलाकारांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात आहेत. या चित्रपटाने चार दिवसांत 42 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

भारतीय वायूसेनेचे शहीद रवी खन्ना यांच्या पत्नी निर्मला यांनी कोर्टात विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. पतीशी संबंधित दृश्ये चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी त्यांनी या याचिकेद्वारे केली होती. चित्रपटात दाखवण्यात आलेले दृश्य आणि त्यांच्या पतीसोबत घडलेल्या घटना यांमध्ये तफावत असल्याचा दावा त्यांनी केला.

कोण होते रवी खन्ना?

जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) प्रमुख यासिन मलिकच्या नेतृत्वाखालील एका गटाने 25 जानेवारी 1990 रोजी श्रीनगरमध्ये चार वायुसेनेच्या जवानांवर गोळ्या झाडल्या होत्या. या चार जवानांपैकी रवी खन्ना एक होते.

“फिर्यादीने मांडलेली तथ्ये लक्षात घेता, शहीद स्क्वाड्रन लीडर रवी खन्ना यांच्याशी संबंधित दृश्ये द काश्मीर फाईल्स या चित्रपटात दाखवण्यापासून रोखण्यात येत आहे,” असं अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश दीपक सेठी यांनी आदेशात म्हटलं आहे. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचं घर सोडावं लागलं होतं. यामध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

हेही वाचा:

कपिल शर्माने ‘द काश्मीर फाईल्स’ला प्रमोट करण्यास दिला नकार? अनुपम खेर यांनी सांगितलं सत्य

‘मन सुन्न झालंय, डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत..’; प्राजक्ता गायकवाडची भावूक पोस्ट

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...