AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मन सुन्न झालंय, डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत..’; प्राजक्ता गायकवाडची भावूक पोस्ट

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji) या गाजलेल्या मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. ती नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. प्राजक्ता आणि तिच्या कुटुंबावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्राजक्ताच्या आजोबांचं अकस्मात निधन झालं असून तिने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट […]

'मन सुन्न झालंय, डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत..'; प्राजक्ता गायकवाडची भावूक पोस्ट
Prajakta GaikwadImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 15, 2022 | 12:35 PM
Share

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji) या गाजलेल्या मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. ती नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. प्राजक्ता आणि तिच्या कुटुंबावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्राजक्ताच्या आजोबांचं अकस्मात निधन झालं असून तिने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘मन सुन्न झालंय, डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत..’ अशा शब्दांत प्राजक्ताने भावना व्यक्त केल्या आहेत. प्राजक्ताची तिच्या आजोबांशी खूप जवळीक होती. आता कोण माझे लाड करणार? आता कोण माझ्यासोबत हरिपाठ घेणार? अभंग म्हणणार?, असं लिहित तिने आजोबांच्या काही आठवणी या पोस्टमध्ये सांगितल्या आहेत.

प्राजक्ताची पोस्ट-

‘आजोबा.. आता कोण बैलगाडी जुंपणार? आता कोण माझे लाड करणार? आता कोण माझ्यासोबत हरिपाठ घेणार? अभंग म्हणणार? शिस्तप्रिय पण मनमिळावू स्वभाव, सगळ्या गावात रुबाब आणि धाक असायचा, येणाऱ्या प्रत्येकाची चेष्टा मस्करी करून बोलणं, तुकारामाची नात म्हणजे आपली येसूबाईंची भूमिका करणारी म्हणून पूर्ण गावात, तालुक्यात चर्चा….माझी नात म्हणून अभिमान बाळगणारे… शेवटपर्यंत स्वाभिमानानं, ताठ मानेनं जगलात… सगळं आयुष्य कष्टानं जगलात. वारकरी संप्रदायात रमणारे, प्रत्येक सप्ताहात वीणा धरणारे, मला लहानपणापासून हरिपाठ , ज्ञानेश्वरी,गाथा आणि संपूर्ण भागवत संप्रदाय शिकवणारे लाडके आजोबा. कितीही प्रयत्न केला तरी डोळ्यातील अश्रू काही थांबत नाहीत, पण हे नातं खूप अतूट होतं आणि कायम राहील. देवाच्या मनात काय आहे याचा कधीच कोणी अंदाज लावू शकत नाही, रात्री सीरिअल बघून एकत्र जेवण करून सकाळी आपण मॉर्निंग वॉकला जाऊ असं म्हणून सोडून गेलात आजोबा. मन अगदी सुन्न झालंय.. परत या आजोबा,’ अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

प्राजक्ताच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी तिच्या आजोबांना श्रद्धांजली वाहिली. ताई आज मला माझ्या आजोबांची आठवण आली, माझं आणि माझ्या आजोबांचं नातं पण असंच होत, असं एकाने लिहिलं. तर देव तुला हे दुःख सहन करण्याची शक्ती देऊ दे, असं दुसऱ्याने म्हटलंय.

हेही वाचा:

कपिल शर्माने ‘द काश्मीर फाईल्स’ला प्रमोट करण्यास दिला नकार? अनुपम खेर यांनी सांगितलं सत्य

नाकात नथ, हिरवी साडी अन् हातात डम्बेल्स! ‘येसू बाई’ फेम प्राजक्ता गायकवाडचा वर्कआऊट व्हिडीओ चर्चेत!

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.