नाकात नथ, हिरवी साडी अन् हातात डम्बेल्स! ‘येसू बाई’ फेम प्राजक्ता गायकवाडचा वर्कआऊट व्हिडीओ चर्चेत!

ट्या पडद्यावर गाजलेली मालिका ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून ‘येसू बाई’ म्हणून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. प्राजक्ता फिटनेसबाबत कायमच दक्ष असते.

नाकात नथ, हिरवी साडी अन् हातात डम्बेल्स! ‘येसू बाई’ फेम प्राजक्ता गायकवाडचा वर्कआऊट व्हिडीओ चर्चेत!
प्राजक्ता गायकवाड

मुंबई : छोट्या पडद्यावर गाजलेली मालिका ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून ‘येसू बाई’ म्हणून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. प्राजक्ता फिटनेसबाबत कायमच दक्ष असते. यासोबतच प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

पण आता मात्र प्राजक्ता गायकवाड एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. प्राजक्ताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्राजक्ता चक्क साडी नेसून वर्कआऊट करताना दिसतेय. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चाचेत आला आहे.

पाहा व्हिडीओ :

या व्हिडीओमध्ये प्राजक्ता हिरव्या रंगाच्या साडीमध्ये डंबेल्सचे सेट मारताना दिसत आहे. प्राजक्ता एका जीमच्या उद्घाटनाला गेली असता, तिथे तिने साडी नेसून वर्क आऊट केले आहे. हा व्हिडीओ या उद्घाटना दरम्यानचा असून, सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. प्राजक्ता अनेकदा सोशल मीडियावरही वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ पोस्ट करत असते.

अलका कुबलसोबतच्या वादामुळे आली चर्चेत!

साताऱ्यात ‘माझी आई काळुबाई’ या मालिकेचे चित्रीकरण सुरु असताना निर्मात्या अलका कुबल-आठल्ये आणि याच मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यामधील झालेला वाद चांगलाच चर्चेत आला होता. यानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी ही मालिका अर्ध्यातूनच सोडली. अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच तु तु मै मै झाली होती.

प्रकरण काय?

अलका कुबल यांच्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेचे चित्रीकरण साताऱ्यात सुरु होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत या सेटवर काही लोकांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर गावकऱ्यांनी गावात चित्रीकरण करण्यास नकार दिला. त्यामुळे पुढील चित्रीकरण मुंबईत करण्यात यावे, असे ठरले होते. म्हणून सगळे क्रू-मेंबर मुंबईला परतले. विवेक आणि प्राजक्ताला एकाच गाडीने परतायचे होते. मात्र, विवेकला उशीर झाल्याने प्राजक्ताने कारण विचारले. त्याने आपण कोव्हिड रुग्णांना दाखल करून येत असल्याचे सांगितल्यावर ती थोडी घाबरली. मात्र हे बोलून दाखवल्यावर विवेकने मला शिवीगाळ करत, माझ्या आईबद्दल अपशब्द उच्चारले, असा आरोप प्राजक्ताने केला होता.

मी एका सामान्य घरातील मुलगी आहे. माझे वडील 8 ते 10 तास काम करतात तेव्हा, आमच्या घरात चूल पेटते. असे असतानाही मला आतापर्यंत मालिकेचा एकही रुपया मिळालेला नाही. उलट मला बदनाम केले जाते आहे. मला या मालिकेचे आतापर्यंत एकही दिवसाचे मानधन मिळालेले नाही’, असे प्राजक्ताने म्हटले होते.

(Yesu Bai fame actress Prajakta Gaikwad Saree Workout video went viral)

हेही वाचा :

Raj Kundra Top 10 Memes : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर मीम्सची बरसात, तुम्हालाही येईल हसू

प्रेग्नन्सीच्या चर्चेला सोनम कपूरचं बेधडक उत्तर, सोशल मीडिया पोस्ट पाहून चाहतेही हैराण!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI