प्रेग्नन्सीच्या चर्चेला सोनम कपूरचं बेधडक उत्तर, सोशल मीडिया पोस्ट पाहून चाहतेही हैराण!

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) लंडनहून मुंबईला आली आहे. सोनमचे मुंबईत आगमन झाल्यानंतर, जेव्हा तिला मुंबई विमानतळावर स्पॉट केले गेले होते, तेव्हा तिच्या प्रेग्नन्सीची बातमी व्हायरल होऊ लागली.

प्रेग्नन्सीच्या चर्चेला सोनम कपूरचं बेधडक उत्तर, सोशल मीडिया पोस्ट पाहून चाहतेही हैराण!
सोनम कपूर
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 1:42 PM

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) लंडनहून मुंबईला आली आहे. सोनमचे मुंबईत आगमन झाल्यानंतर, जेव्हा तिला मुंबई विमानतळावर स्पॉट केले गेले होते, तेव्हा तिच्या प्रेग्नन्सीची बातमी व्हायरल होऊ लागली होती. काही दिवसांपासून सोनम गर्भवती असल्याच्या चर्चा रंगत होत्या, असे म्हटले जात होते की म्हणूनच ती भारतात आली आहे. अखेर या बातमीवर सोनमने आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सोनमने स्वत:चा एक व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले की, ‘माझ्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसासाठी गरम पाण्याची बाटली आणि आल्याची चहा.’ अप्रत्यक्षपणे गरोदरपणाच्या वृत्तावर सोनमने तिचे बेधडक उत्तर दिले आहे.

पाहा सोनम कपूरची पोस्ट

Sonam Kapoor

सोनम कपूर

वडिलांना भेटताच झाली भावनिक

सोनम जेव्हा भारतात आली, तेव्हा अनिल कपूर तिला विमानतळावर घ्यायला आले होते. सोनम विमानतळावरुन बाहेर येताच वडिलांना भेटताच, त्यांना पाहून ती खूपच भावूक झाली आणि त्यांना मिठी मारून रडू लागली. सोनमच्या डोळ्यात अश्रू स्पष्ट दिसत होते. यानंतर घरी गेल्यानंतर ती संपूर्ण कुटुंबाला भेटली.

सोनम कपूर, पती आनंद आहूजाबरोबर लंडनमध्ये राहत होती. भारतपासून दूर राहत असलेली सोनम बऱ्याच काळानंतर लंडनहून मुंबईला परतली आहे. सोनम कपूर बहुतेकदा सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सांगत असायची की तिला भारत देश, तिचे आईवडील आणि भावंडांची किती आठवण येते. अखेर आता सोनम लंडनहून भारतात परतली आहे.

परदेशी राहण्याचा आनंद!

सुजॉय घोषच्या ‘ब्लाइंड’ या चित्रपटाद्वारे लवकरच अभिनयात पुनरागमन करणारी सोनम कपूर-आहूजा 2018मध्ये लग्नानंतर लंडनमध्ये स्थायिक झाली आहे. अभिनेत्री फक्त खास प्रसंगीच मुंबईत येते, पण ती आपला बहुतांश वेळ लंडनमध्येच घालवते. लंडनचे स्वातंत्र्य मला आवडते, असे म्हणत तिने भारत सोडून परदेशात स्थायिक झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता.

अलीकडेच व्होगशी झालेल्या संभाषणात सोनम कपूर म्हणाली होती की, ‘मला इथले स्वातंत्र्य आवडते. मी स्वतःहून जेवण बनवते, घर स्वच्छ करते, किराणा समान आणते’. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार लंडनमध्ये वर्षानुवर्षे वास्तव्य करूनही तिला इथे पर्यटकांसारखे वाटते. पण आनंदसारखा नवरा मिळणे हे आपले भाग्य असल्याचे ती म्हणते.

(Sonam Kapoor gives epic reply over her pregnancy)

हेही वाचा :

कंटेंट अश्लील होता, परंतु तो ‘प्रौढ’ प्रकारात येऊ शकत नाही! राज कुंद्राच्या वकिलाचा दावा

Photo : शिल्पा शेट्टीला रिप्लेस करणार करिश्मा कपूर?, ब्लॅक ड्रेसमध्ये दिसला ग्लॅमरस अवतार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.