कंटेंट अश्लील होता, परंतु तो ‘प्रौढ’ प्रकारात येऊ शकत नाही! राज कुंद्राच्या वकिलाचा दावा

मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी रात्री उशिरा शिल्पा शेट्टीचे पती आणि व्यापारी राज कुंद्रा (Raj Kundra) याला अटक केली. अश्लील चित्रपट बनवण्यासाठी आणि काही अ‍ॅप्सद्वारे ते प्रदर्शित केल्याबद्दल पोलिसांनी राज यांना अटक केली आहे.

कंटेंट अश्लील होता, परंतु तो 'प्रौढ' प्रकारात येऊ शकत नाही! राज कुंद्राच्या वकिलाचा दावा
राज कुंद्रा

मुंबई : मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी रात्री उशिरा शिल्पा शेट्टीचे पती आणि व्यापारी राज कुंद्रा (Raj Kundra) याला अटक केली. अश्लील चित्रपट बनवण्यासाठी आणि काही अ‍ॅप्सद्वारे ते प्रदर्शित केल्याबद्दल पोलिसांनी राज यांना अटक केली आहे. राज यांच्या अटकेने संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री हैराण झाली आहे. राज बद्दल एकामागून एक अनेक खुलासे होत आहेत आणि सगळेजण त्यामुळे चकित झाले आहेत. राज आणि त्याचा साथीदार रायन थोरोपे यांना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मंगळवारी राज यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, या कंटेंटला अश्लील म्हणणे योग्य ठरणार नाही. या रिमांडमध्ये असे काहीही दर्शवलेले नाही की राज आणि रायन हे दोघेही अश्लील कंटेंट बनवत होते. सामग्री अश्लील होती, परंतु त्याला ‘प्रौढ’ सामग्री म्हणता येणार नाही.

राज यांच्या अटकेबाबत वकील पुढे म्हणाले की, ‘अटक तेव्हा व्हायली जेव्हा त्याच्याशिवाय चौकशी करता येत नसेल, परंतु या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्यांची अटक कायद्याच्या अनुषंगाने नाही’, असेही राज यांच्या वकिलांनी म्हटले आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंगची योजना

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, राज यांना अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांना असे काही पुरावे मिळाले आहेत की,  त्यात म्हटले की राज येत्या काळात या अश्लील सामग्रीचे थेट प्रक्षेपण करण्याचा विचार करत होते. बातम्यांनुसार, हेदेखील समोर आले आहे की, तो अश्लील चित्रपटांनाही बॉलिवूड इंडस्ट्री इतका मोठा बनवू इच्छित होता.

यात शिल्पाची काहीही भूमिका नाही!

राजच्या अटकेनंतर सर्वांच्या मनात असाच प्रश्न निर्माण झाला होता की, शिल्पाला याबद्दल माहित होते का? की शिल्पाचीही यात भूमिका होती? या प्रश्नांची उत्तरे मुंबई पोलिसांनी दिली आहेत.

मुंबई पोलिसांचे सहआयुक्त मिलिंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या प्रकरणात शिल्पाची कोणतीही भूमिका त्यांनी दिसली नाही. ते म्हणाले, ‘आम्हाला अद्याप शिल्पाची कोणतीही सक्रिय भूमिका दिसलेली नाही. मात्र तपास अद्याप सुरू आहे. पीडितांनी पुढे येऊन गुन्हे शाखा मुंबई येथे संपर्क साधावा. असे आम्ही आवाहन करतो. आम्ही योग्य कारवाई करू.’

(Raj Kundra’s lawyer claims that The content was obscene but it could not come in ‘adult’ type)

हेही वाचा :

Raj Kundra case | करारावर सही करण्यास नकार दिला म्हणून माझा फोन नंबर लीक केला! पूनम पांडेचा राज कुंद्रावर गंभीर आरोप!

Raj Kundra Case | गुन्हे शाखेची राज कुंद्रावर कडक कारवाई, वेगवेगळ्या खात्यातील 7 कोटींपेक्षा अधिक रक्कम फ्रीज!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI