Raj Kundra case | करारावर सही करण्यास नकार दिला म्हणून माझा फोन नंबर लीक केला! पूनम पांडेचा राज कुंद्रावर गंभीर आरोप!

अश्लील चित्रपट बनवण्यासाठी आणि ते काही अ‍ॅप्सद्वारे प्रदर्शित केल्याबद्दल राज कुंद्राला (raj kundra) अटक झाल्यानंतर आता अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) यांनी त्यांच्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

Raj Kundra case | करारावर सही करण्यास नकार दिला म्हणून माझा फोन नंबर लीक केला! पूनम पांडेचा राज कुंद्रावर गंभीर आरोप!
पूनम-राज

मुंबई : अश्लील चित्रपट बनवण्यासाठी आणि ते काही अ‍ॅप्सद्वारे प्रदर्शित केल्याबद्दल राज कुंद्राला (raj kundra) अटक झाल्यानंतर आता अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) यांनी त्यांच्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. आता पूनमने असे म्हटले आहे की, तिला करारावर सक्तीने सही करण्यास भाग पाडले गेले होते आणि जेव्हा तिने नकार दिला तेव्हा तिला धमकी देखील देण्यात आली.

एका वेबसाईटशी बोलताना पूनम पांडे म्हणाली, ‘मला धमकावले गेले होते की, मला त्यांच्या करारानुसार शूट करावे लागेल आणि त्याच्या इच्छेनुसार पोज देखील करावे लागेल, अन्यथा ते माझ्या वैयक्तिक गोष्टी लीक करतील.’

अश्लील मेसेजसह नंबर लीक

पूनम पुढे म्हणाली, ‘जेव्हा मी करारावर सही करण्यास नकार दिला आणि माझा करार संपवण्यास सांगितले, तेव्हा एका अश्लील रेकॉर्ड मेसेजसह त्यांनी माझा नंबर लीक केला. मला आठवते की, त्यानंतर मला बरेच कॉल आले, तेही रात्री खूप उशिरा. लोक माझ्याशी घाणेरडे बोलत होते, मला आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडीओ पाठवत होते. मी वैतागून अगदी माझे घर देखील सोडले होते. मला भीती होती की माझ्याकडून काहीतरी चुकले असेल.’

पूनमने या सर्व गोष्टींमध्ये अडकलेल्या इतर लोकांनाही पुढे येण्याचे आवाहन केले आहे. ती म्हणाली की, माझ्या वकिलाने मला कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला होता, परंतु मी तरी बोलत आहे कारण असे जर माझ्या बाबतीत घडले तर बाकीच्या लोकांचे काय झाले असेल, हे मला ठाऊक नाही. म्हणून बळी पडलेल्या व्यक्तींनी पुढे या आणि स्वत: साठी लढा.’

शिल्पा आणि राजच्या मुलांबद्दल वक्तव्य

यापूर्वी राज यांना अटक करण्यात आली तेव्हा पूनम म्हणाली होती, ‘यावेळी मला शिल्पा शेट्टी आणि तिच्या दोन मुलांबद्दल खूप सहानुभूती वाटत आहे. या वेळी त्यांनी काय केले पाहिजे याची मी कल्पनाही करू शकत नाही, म्हणून मी माझे दु:ख आणि वेदना या गोष्टींबद्दल सांगणार नाही. पण मी हेच सांगेन की 2019 मध्ये मी राज कुंद्राविरोधात तक्रार दाखल केली होती आणि त्याच्याविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्यामुळे मी त्याबद्दल जास्त सांगू शकत नाही. पोलीस व कायद्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.’

(Raj Kundra case Poonam Pandey reveals Raj Kundra threatened her)

हेही वाचा :

Raj Kundra Case | गुन्हे शाखेची राज कुंद्रावर कडक कारवाई, वेगवेगळ्या खात्यातील 7 कोटींपेक्षा अधिक रक्कम फ्रीज!

राज कुंद्राच्या अटकेनंतर पत्नी शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मधून बाहेर?, सेटवर गैर हजेरीमुळे चर्चांना उधाण!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI