अलका कुबल-प्राजक्ता गायकवाड यांच्यातला वाद उदयनराजेंच्या दरबारी

जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यातल्या वाद भाजपचे राज्यसभेचे उदयनराजे भोसले यांच्या दरबारात पोहोचला आहे.

अलका कुबल-प्राजक्ता गायकवाड यांच्यातला वाद उदयनराजेंच्या दरबारी
Akshay Adhav

|

Nov 08, 2020 | 6:41 PM

सातारा : जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यातल्या वाद भाजपचे राज्यसभेचे उदयनराजे भोसले यांच्या दरबारात पोहोचला आहे. अलका कुबल यांनी आज उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. (Alka kubal meet Udyanraje Bhosale)

अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच तु तु मै मै झाली. मात्र सध्या या प्रकरणात साताऱ्यासह राज्यातील काही संघटनांनी अलका कुबल यांनी प्राजक्ता गायवाडची माफी मागावी आणि मालिकेतील प्रमुख कलाकार रवी सांगळे यांना मालिकेतून काढून टाकावे अन्यथा साताऱ्यात सुरु असलेले ‘माझी आई काळुबाई’ या मालिकेचं चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांनी आज उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन चित्रीकरणाच्या सेटवर प्राजक्ता गायकवाड यांची वस्तुस्थिती नेमकी काय होती ही मांडली.

साताऱ्यात ‘माझी आई काळुबाई’ या मालिकेचे चित्रीकरण सध्या सुरु असून निर्मात्या अलका कुबल-आठल्ये आणि याच मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यामधील झालेला वाद चांगलाच चर्चेत आला. यानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी ही मालिका अर्ध्यातूनच सोडली. अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच तु तु मै मै झाली.

दरम्यान, उदयनराजे यांनी अलका कुबल यांची बाजू जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडसोबत फोनवर चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती केली.

वारंवार तक्रार करूनही दाखल घेतली नाही : प्राजक्ता गायकवाड

अलका कुबल यांच्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेचे चित्रीकरण साताऱ्यात सुरु होते. मात्र, मागच्या महिन्यात या सेटवर काही लोकांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर गावकऱ्यांनी गावात चित्रीकरण करण्यास नकार दिला. त्यामुळे पुढील चित्रीकरण मुंबईत करण्यात यावे, असे ठरले होते. म्हणून सगळे क्रू-मेंबर मुंबईला परतले. विवेक आणि प्राजक्ताला एकाच गाडीने परतायचे होते. मात्र, विवेकला उशीर झाल्याने प्राजक्ताने कारण विचारले. त्याने आपण कोव्हिड रुग्णांना दाखल करून येत असल्याचे सांगितल्यावर ती थोडी घाबरली. मात्र हे बोलून दाखवल्यावर विवेकने मला शिवीगाळ करत, माझ्या आईबद्दल अपशब्द उच्चारले, असा आरोप प्राजक्ताने केला.

अलकाताईंचे आरोप खोटे

प्राजक्ताच्या एक्झिटवर बोलताना अलका कुबल यांनी ती सतत परीक्षेच्या नावाने सुट्ट्या घेते आणि कार्यक्रम करते, असा आरोप केला होता. यावर प्राजक्ताने आपली बाजू स्पष्ट केली आहे. ती म्हणते, ‘मी परीक्षेसाठी सुटी घेणार हे आधीच सांगितले होते. माझ्यामुळे कधीच चित्रीकरण थांबलेले नाही. मी इव्हेंटची सुपारी घेते, असा आरोप झाला, त्यात तथ्य नाही. कोरोनामुळे सध्या इव्हेंट बंद आहेत. त्यामुळे हे कारण पटणारं नाही.’

‘मालिकेत मला तोकडे कपडे घालण्याचे काही प्रसंग होते, त्याला माझा विरोध होता. त्यानंतर मला चक्क रक्त लागलेली साडी दिली गेली. माझ्या आईने त्याविषयी विचारले तर, त्याला माझ्या आईचा हस्तक्षेप म्हटले गेले’.

मालिकेचे पैसे दिलेले नाहीत

मी एका सामान्य घरातील मुलगी आहे. माझे वडील 8 ते 10 तास काम करतात तेव्हा, आमच्या घरात चूल पेटते. असे असतानाही मला आतापर्यंत मालिकेचा एकही रुपया मिळालेला नाही. उलट मला बदनाम केले जाते आहे. मला या मालिकेचे आतापर्यंत एकही दिवसाचे मानधन मिळालेले नाही’, असे प्राजक्ताने म्हटले.

फक्त मालिका, चित्रपट किंवा वेब सीरीजच करायच्या, असे काही मी ठरवलेले नाही. त्यामुळे यापुढे मला रंगभूमीवर नाटकही करायला आवडेल. मी जे काही करेन ते समरस होऊन करेन, असे म्हणत तिने आपल्या भविष्याच्या वाटचालीवर भाष्य केले. तसेच, मी अजून राजकारणात प्रवेश करण्याचा कोणताही विचार केलेला नाही. मात्र, जे करेन ते मनापासून करेन, असे प्राजक्ताने म्हटले.

संबंधित बातम्या

Prajakta Gaikwad | अलकाताई आईसारख्या, मात्र नराधमाची पाठराखण, प्राजक्ता गायकवाडचे धक्कादायक आरोप

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें