हे बघा! दीपिका पदुकोण खोटं बोलत नाही, खास फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

नुकतंच दीपिका आणि तिचा पती रणवीर सिंहने आपल्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे, आपण आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर काही युजर्सने त्यांच्यावर टीका केली होती. या सर्व टीका-टीप्पणी आणि शुभेच्छांच्या वर्षावानंतर दीपिकाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.

हे बघा! दीपिका पदुकोण खोटं बोलत नाही, खास फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
हे बघा! दीपिका पदुकोण खोटं बोलत नाही, खास फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
Follow us
| Updated on: Jun 19, 2024 | 8:04 PM

एका बाईच्या आयुष्यातील सर्वात सुवर्णक्षण कुठला असेल तर तो आई होणं आहे. आई होणं ही भावनाच फार ग्रेट असते. देशातील एक सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री देखील आता या फेजमधून जाताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने काही दिवसांपूर्वी गुड न्यूज शेअर केली होती. आपल्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं दीपिकाने जाहीर केलं होतं. त्यानंतर दीपिका पदुकोण आणि तिचा नवरा रणवीर सिंह हे एका वेगळ्या लेव्हलच्या आनंदात आहेत. दोघांनी मिळून सोशल मीडियावर आपण आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. पण त्यानंतर दीपिकाला अनेकांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. दीपिकाने दिलेली बातमी खोटी असल्याचा दावा अनेकांनी केला होता. दीपिका नाटक करत असल्याचा टीका काही युजर्सने केली होती. अखेर टीका करणाऱ्या आणि ट्रोल करणाऱ्या युजर्सला दीपिकाने आज सडेतोड उत्तर दिलं आहे. कारण दीपिकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे दीपिका सांगत असणारी बातमी खरी असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे.

दरम्यान, दीपिकाच्या चाहत्यांमध्ये तिने दिलेल्या गुड न्यूजपासून आनंदाचं वातावरण आहे. दीपिकाचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तसेच तिचं बाळ या दुनियेत कधी येईल? अशी विचारणा सोशल मीडियावर करताना दिसत आहेत. तिच्या चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. अनेकांकडून दीपिकाच्या येणाऱ्या बाळाला आशीर्वादही देण्यात येत आहेत.

दीपिकाने शेअर केलेल्या फोटोत नेमकं काय?

नुकतंच दीपिका आणि तिचा पती रणवीर सिंहने आपल्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे, आपण आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर काही युजर्सने त्यांच्यावर टीका केली होती. या सर्व टीका-टीप्पणी आणि शुभेच्छांच्या वर्षावानंतर दीपिकाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोत दीपिका बेबी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. दीपिकाने आज शेअर केलेल्या फोटोत ती फिट ब्लॅक ड्रेसमध्ये बघायला मिळत आहे. या दरम्यान बेबी बंप फ्लॉन्ट होताना स्पष्ट दिसत आहे. दीपिकाला हा फोटो बघून आनंद झाला असेल त्यामुळे तिला आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर करावा म्हणून कदाचित तिने आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला असावा.

दीपिकाच्या नव्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन चित्रपटात झळकताना दिसणार आहे. या चित्रपटात ती अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग याआधीच झाली आहे. सध्या दीपिकाने ब्रेक घेतला आहे. ती कधीतरी कार्यक्रम, पार्टीज किंवा कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते.

Non Stop LIVE Update
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी.
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा.
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका.
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी.
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?.
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?.
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले.
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा.
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद.
नाशिक-मुंबई महामार्ग, कसारा घाट धुक्यात हरवलं, बघा निसर्गाचं सौंदर्य
नाशिक-मुंबई महामार्ग, कसारा घाट धुक्यात हरवलं, बघा निसर्गाचं सौंदर्य.