AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच ‘दिवाळे’; मंगळवारीच अमंगळ; 930 अंकांनी आपटला Sensex, गुंतवणूकदारांचे 8.51 लाख कोटी पाण्यात

Share Market Crash : शेअर बाजाराने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना झटका दिला आहे. बजाज फायनान्स, एल अँड टी, मारुती सुझूकी, टाटा मोटर्स, एसबीआय शेअरमध्ये जवळपास 3 टक्क्यांची मोठी घसरण झाली. तर एनएएसईवर 299 शेअरमध्ये उसळी तर 2,466 शेअरमध्ये घसरण दिसून आली. आज Sensex 930 अंकांनी आपटला.

शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच 'दिवाळे'; मंगळवारीच अमंगळ; 930 अंकांनी आपटला Sensex, गुंतवणूकदारांचे 8.51 लाख कोटी पाण्यात
बाजारात पुन्हा घसरण
| Updated on: Oct 22, 2024 | 5:19 PM
Share

शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा झटका दिला. BSE Sensex 930 अंकांनी आपटला. सेन्सेक्स 80,220 अंकावर आला. तर निफ्टी 50 इंडेक्समध्ये 310 अंकांची घसरण झाली. निफ्टी 24,472 अंकावर बंद झाला. तर निफ्टी बँक 700 अंकांनी घसरला. बीएसई सेन्सेक्सचे टॉप 30 शेअरमध्ये आज ICICI बँकचा शेअर एकदम उसळी घेतली. तर इतर सर्व 29 शेअर रेड अलर्टवर व्यापार करत होते. महिंद्री अँड महिंद्राच्या शेअरमध्ये 3.29 टक्क्यांची घसरण आली. आजचा मंगळवार ग्राहकांसाठी अमंगळ ठरला. आज बाजारात गुंतवणूकदारांचे 8.51 लाख कोटी पाण्यात गेले.

शेअरमध्ये मोठी घसरण

JSW Steel, बजाज फायनान्स, एल अँड टी, मारुती सुझुकी, इंडसईंड बँक, टाटा मोटर्स, एसबीआय सारख्या शेअरमध्ये जवळपास 3 टक्क्यांपर्यंत घसरण दिसली. NSE च्या 2,825 शेअरमध्ये 299 स्टॉकने उसळी घेतली. तर 2,466 शेअरमध्ये मोठी घसरण झाली. 60 शेअरमध्ये कोणताचा बदल झाला नाही. तर 48 शेअर्संनी नवीन विक्रमाला गवसणी घातली. तर 150 शेअर्स 52 आठवड्यातील सर्वात निच्चांकावर पोहचले. 49 शेअर अप्पर सर्किट आणि 309 शेअर लोअर सर्किटवर आले.

या सेक्टरमध्ये सर्वात मोठी घसरण

आज निफ्टी बँकेपासून ते आरोग्य क्षेत्रातील स्टॉकमध्ये मोठी घसरण दिसली. पीएसयू बँकेच्या शेअरमध्ये 4.47 टक्क्यांपर्यंत घसरण आली. स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये मोठी घसरण दिसली. बीएसई स्मॉलकॅप 2,186.12 अंकाने कोसळला. तर BSE Midcap मध्ये 1,214.83 अंकांची घसरण दिसली.

परदेशी पाहुण्यांचे विक्री सत्र

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात मोठा खेला केला. ऑक्टोबर महिन्यात या परदेशी पाहुण्यांनी भारतीय शेअर बाजारातून विक्रमी 82,479 कोटी रुपये काढून घेतले. मार्च 2020 च्या सुरुवातीला परदेशी गुंतवणूकदारांनी 65,816 कोटी रुपये काढले होते. त्यावेळी भारतीय गुंतवणूकदारांनी मोठा खड्डा भरला होता. आता परदेशी पाहुण्यांनी चीनकडे मोर्चा वळवल्याने भारतीय शेअर बाजारात त्सुनामी आली आहे.

जागतिक बाजारात स्थिती काय?

जागतिक बाजारात सध्या नरमाईचे संकेत आहेत. अमेरिकन बाजारात सोमवारी तीन प्रमुख निर्देशांकांपैकी केवळ एकच तेजीत दिसला. तर जपान आणि दक्षिण कोरियासारख्या आशियाई बाजारांत 1 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसली. चीन आणि हाँगकॉगच्या बाजाराने मात्र उलट प्रतिक्रिया नोंदवली. येथील शेअर बाजारात तेजीचे सत्र दिसून आले.

Follow Us
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?