AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेक लाडकी योजनेच्या नियमात मोठा बदल, आदिती तटकरे यांची मोठी घोषणा, आता थेट…

लेक लाडकी योजनेच्या लाभासाठी आता अर्जदारांना महाडीबीटी 2.0 पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. यासाठी सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या देखील कमी करण्यात आली आहे.

लेक लाडकी योजनेच्या नियमात मोठा बदल, आदिती तटकरे यांची मोठी घोषणा, आता थेट...
Aditi Tatkare Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 31, 2026 | 4:02 PM
Share

लेक लाडकी योजनेच्या लाभासाठी आता अर्जदारांना महाडीबीटी 2.0 पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. यासाठी सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करून अर्ज नोंदणी ते अर्जाची सद्यस्थिती पाहण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. यापूर्वी लेक लाडकी योजनेसाठी अर्जदारांना नजीकच्या अंगणवाडी केंद्रात भेट देऊन अर्ज जमा करावा लागत होता. त्यानंतर हे अर्ज प्रकल्प स्तरावर एकत्रित करून तत्कालीन पोर्टलवर त्यांची नोंदणी केली जात होती. पुढे अर्जांची छाननी करून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जात होती. तसेच अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी केंद्रात प्रत्यक्ष जाणे अनिवार्य होते.

परंतु आता शासनाच्या विविध योजनांच्या सुसूत्रीकरणाबाबतच्या सूचनांच्या अनुषंगाने लेक लाडकी योजनेच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे. यासाठी नवीन शासन प्रक्रिया पुनर्रचना (जीपीआर) तयार करण्यात आला असून, त्याअंतर्गत अर्जदारांना स्वतः ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज नोंदणी, छाननी, अर्ज मंजुरी आणि लाभ मंजुरी या प्रक्रियांमध्ये सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. तसेच अर्जदारांना सादर करावयाच्या कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात आली आहे.

या नवीन व्यवस्थेमुळे विशेषतः ज्या ठिकाणी अंगणवाडी केंद्र कार्यान्वित नाहीत, अशा भागांतील लाभार्थ्यांना अर्ज सादर करताना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. राज्यातील कोणत्याही क्षेत्रातील रहिवाशांना आता या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. याशिवाय, अर्जदारांना त्यांनी सादर केलेल्या अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन पाहण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. आता अर्ज प्रक्रिया देखील ऑनलाइन करण्यात आल्याने योजनेच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.  लेक लाडकी योजनेअंतर्गत आज पर्यंत पहिला लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची संख्या 2,98,695 इतकी आहे.

Follow Us
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण