अरे यार कसे तरी होते… महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाबद्दल विचारता जान्हवी कपूर हिचे मोठे विधान, म्हणाली, त्यांच्याबद्दल…
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. अनेकदा जान्हवी तिच्या खासगी आयुष्याबद्दल स्पष्ट बोलताना दिसते. आता नुकताच जान्हवी कपूरने थेट मोठे विधान तिच्या आयुष्यातील घडामोडींवर केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. जान्हवी कपूर हिची सावत्र बहीण अंशुला कपूर हिच्या साखरपुड्यात जान्हवी धमाल करताना दिसली. जान्हवी शिखर पहाडियाला डेट करत आहे. कपूर कुटुंबियांच्या प्रत्येक कार्यक्रमात शिखर पहाडिया उपस्थित असतो. नुकताच बोनी कपूर यांचा वाढदिवस झाला. खास पार्टीचे आयोजन केले होते आणि फक्त कुटुंबियातील सदस्य उपस्थित होते. यादरम्यान चांगला वेळ शिखर पहाडिया कपूर कुटुंबियांशी घालताना दिसला. हेच नाही तर बोनी कपूर यांच्यासोबतही काही दिवसांपूर्वी विमानतळावर शिखर पहाडिया स्पॉट झाला. शिखर पहाडिया हा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. खासदार प्रणिती शिंदे त्याची सख्खी मावशी आहे. शिखर पहाडिया अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे.
शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर लग्न करणार असल्याची चर्चा आहे. बॉलिवूडच्या प्रत्येक पार्टीमध्ये दोघे कायमच एकमेकांच्यासोबत दिसतात. नुकताच जान्हवी कपूर हिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती तिच्या खासगी आयुष्यावर बोलताना दिसली. हेच नाही तर शिखर पहाडिया याच्याबद्दल विचारताच जान्हवीला काय उत्तर देऊ काय नको असे झाल्याचे स्पष्ट तिच्या आवाजाहून आणि चेहऱ्याहून दिसले.
जान्हवी कपूर म्हणाली की, मी माझ्या आयुष्यात सध्या खूप जास्त आनंदी आहे. माझ्याकडे आणि तुम्ही ज्यांचे नाव घेत आहेत, त्यांच्याकडे कोणताही वेळ नाही. यावेळी जान्हवीला विचारण्यात आले की, नाव घेण्यात काय समस्या आहे? यावर जान्हवीने म्हटले की, नको… हेडलाईन बनते, नाव तर मी खूपदा घेते. यावर जस्सी म्हटल्यावर जान्हवी म्हणते की. जस्सी? जान्हवी आणि शिखर.. यावर जान्हवी कपूर म्हणाली, हे मला नाही आवडत… जानवर म्हणताना जान्हवी दिसली.
पुढे जान्हवी कपूर म्हणाली की, अरे यार… मी अशी वेगळी होते… असे प्रश्न त्यांच्याबद्दल विचारले की, कसे तरी होते, मी नाही उत्तर देणार… असेही जान्हवीने म्हटले. आता जान्हवी कपूर हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया कायमच एकत्र स्पॉट होताना दिसतात.
