Video : “उरलंयच काय जे फोटोने झाकतीयेस?”, Urfi Javed च्या नव्या व्हीडिओवर नेटकऱ्यांचा सवाल

Urfi javed Video : उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिचे फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही तिने असाच एक व्हीडिओ शेअर केलाय.ज्यावरून ती ट्रोल झाली आहे.

Video : उरलंयच काय जे फोटोने झाकतीयेस?, Urfi Javed च्या नव्या व्हीडिओवर नेटकऱ्यांचा सवाल
उर्फी जावेद ट्रोल
Image Credit source: उर्फी जावेद इन्स्टाग्राम
| Edited By: | Updated on: Mar 29, 2022 | 1:08 PM

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या अतरंगी कपड्यामुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या काही चाहत्यांना तिचा लूक खूप आवडतो. तर काहींना तो इतका खटकतो की ते नेटकरी मग तिला ट्रोल करतात. उर्फीने पुन्हा एकदा तिचा अशाच अतरंगी लूकमधला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केलाय. जो प्रचंड व्हायरल होतोय.यात तिने स्वत:च्याच फोटोंचा ड्रेस घातलाय. या तिच्या अतरंगी व्हीडिओवर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं नसतं तरच नवल! “उरलंयच काय जे फोटोने झाकतीयेस?”, असा थेट सवाल एका नेटकऱ्यांनी तिला विचारलाय.

फोटोंचा ड्रेस, उर्फी ट्रोल

उर्फी जावेदने स्वत:च्याच फोटोंचा ड्रेस घातलाय.या व्हीडिओला “तिने तुम्ही खऱ्या उर्फीसोबत इभे आहात का? मलाही कल्पना इंटरनेटवर बघून सुचली, त्यामुळे मी असा व्हीडिओ शेअर करत तुमच्यासमोर आली आहे”, असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या व्हीडिओला दोन तासात 60 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर दिड हजार कमेंट या व्हीडिओच्या खाली पहायला मिळत आहेत.

नेटकऱ्यांचा संताप

उर्फी जावेदला पसंत करणारा एक वर्ग आहे. याशिवाय तिचा हा बोल्डनेस न आवडणारा, तिला नापसंत करणाराही एक वर्ग आहे. हे दोन्ही प्रकारचे लोक तिच्या व्हीडिओवर कमेंट करत असतात. तिच्या चाहत्यांनी कमेंट करून “आम्ही तुझ्यासोबत आहोत. तु अशीच पुढे जात राहा”, असं म्हटलंय. तर काहींनी तिला ट्रोल केलंय. यातील एका नेटकऱ्याने तिला “उरलंयच काय जे फोटोने झाकतीयेस?”, असा प्रश्न विचारलाय. दुसरा नेटकरी म्हणतो “हे काय फोटो फ्रेम बनून फिरते आहेस…” “अजब स्टाईल आहे तुझी…” असं तिसऱ्याने म्हटलंय. “आता तर हद्द झाली, काय कपडे घातले आहेस तू? तुला तरी कळत आहे का?” असं आणखी एकजण म्हणाला आहे.

वॉचमनशी भिडली

उर्फी जावेदचा काल एक व्हीडिओ समोर आला होता. यात ती वॉचमनशीही बाचाबाची करताना दिसतेय. यात ती फॅन्सी ड्रेस घालून आलेली दिसत आहे पण तिला फोटो काढायला जागा सापडत नव्हती. अश्यात तिची तिथल्या वॉचमनशीही बाचाबाची होते. तिचा हा व्हीडिओ व्हायरल होतोय.

संबंधित बातम्या

Video: विराजस-शिवानीने गुपचूप उरकलं लग्न? व्हिडीओ आला समोर

Vishu Marathi Movie : विशू सिनेमातील ‘रे मना’ गाणं प्रदर्शित, सिनेमा 8 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार

“एखादी सावळी अभिनेत्री सांगा, जी सुपरस्टार असेल”; बॉलिवूडमधील वर्णभेदावर नवाजुद्दीनने साधला निशाणा