Video: विराजस-शिवानीने गुपचूप उरकलं लग्न? व्हिडीओ आला समोर

Video: विराजस-शिवानीने गुपचूप उरकलं लग्न? व्हिडीओ आला समोर
Virajas and Shivani
Image Credit source: Instagram

अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) यांनी काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावर रिलेशनशिपची जाहीर कबुली दिली. मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील हे लोकप्रिय कलाकार गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

स्वाती वेमूल

|

Mar 29, 2022 | 12:26 PM

अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) यांनी काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावर रिलेशनशिपची जाहीर कबुली दिली. मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील हे लोकप्रिय कलाकार गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. विराजस आणि शिवानी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांसोबतचे फोटो नेहमीच शेअर करतात. मात्र सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नसोहळ्याला जेव्हा दोघांनी एकाच रंगसंगतीचे कपडे परिधान करत हजेरी लावली, तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. या चर्चांवर तसं दोघांनी स्पष्टपणे होकार किंवा नकारही दिला नव्हता. मात्र काही महिन्यांपूर्वीच हातातील अंगठीचा फोटो पोस्ट करत शिवानीने विराजसोबत रिलेशनशिप असल्याचं जाहीर केलं. आता या दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून या दोघांनी गुपचूप लग्न (Wedding) केलं की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होतोय विराजस-शिवानीच्या लग्नाचा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शिवानी आणि विराजस हे वर-वधूच्या पोशाखात पहायला मिळत आहेत. मंडपाची सजावट, रोषणाई, वरमाळा घातलेले शिवानी आणि विराजस यामध्ये दिसत आहेत. शिवानीने हिरव्या रंगाची काठपदराची साडी नेसली आहे. तर विराजसनेही त्याच रंगसंगतीची शेरवानी आणि जॅकेट परिधान केला आहे. या व्हिडीओमध्ये विराजस शिवानीच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे. त्यामुळे या दोघांनी लग्न केलं की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

व्हिडीओमागील सत्य

शिवानी-विराजसचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ त्यांच्या लग्नाचा नसून एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यानचा आहे. एका ज्वेलरी ब्रँडसाठी या दोघांनी हे खास शूटिंग केलं असून त्याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराजस हा प्रख्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेतील त्याची भूमिका चांगलीच गाजली होती. तर शिवानीने ‘बन मस्का’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. विराजस हा लेखक आणि दिग्दर्शकसुद्धा आहे. त्याने हॉस्टेल डेज या चित्रपटातही काम केलं होतं.

हेही वाचा:

“एखादी सावळी अभिनेत्री सांगा, जी सुपरस्टार असेल”; बॉलिवूडमधील वर्णभेदावर नवाजुद्दीनने साधला निशाणा

“अनेकदा उपाशीपोटी झोपलो, बस तिकिटाचेही पैसे नव्हते”; The Kashmir File मधील अभिनेत्याचा संघर्ष

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें