AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vishu Marathi Movie : विशू सिनेमातील ‘रे मना’ गाणं प्रदर्शित, सिनेमा 8 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Vishu Marathi Movie : 'विशू' चित्रपटातील 'रे मना' हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले असून या गाण्याला नेहा राजपाल हीच सुमधुर आवाज लाभला आहे. तर ह्रषिकेश कामेरकर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.

Vishu Marathi Movie : विशू सिनेमातील ‘रे मना’ गाणं प्रदर्शित, सिनेमा 8 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार
विशू सिनेमातील ‘रे मना’ हे गाणं प्रदर्शित झालंयImage Credit source: TV9
| Updated on: Mar 29, 2022 | 12:37 PM
Share

मुंबई : जेव्हा दोन विभिन्न स्वभावाच्या व्यक्तींची हळुवार खुलत जाणारी प्रेमकहाणी आपल्याला ‘विशू’मध्ये (Vishu) पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता ‘विशू’ चित्रपटातील ‘रे मना’ (Re Mana) हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला मंगेश कांगणे (Mangesh Kangane) यांनी शब्दबद्ध केले असून या गाण्याला नेहा राजपाल (Nehaz Rajpal) हीच सुमधुर आवाज लाभला आहे. तर ह्रषिकेश कामेरकर (Hrishikesh Kamerkar) यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. ‘रे मना’ हे गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) आणि मृण्मयी गोडबोले (Mrunmayi Godbole) यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात गश्मीर आणि मृण्मयी यांच्यातील अव्यक्त प्रेम नजरेने व्यक्त करत आहेत. या गाण्याचे बोल अतिशय सुंदर असून प्रेमाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देणारे हे गाणे आहे.

‘रे मना’ प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला

‘विशू’ चित्रपटातील ‘रे मना’ हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले असून या गाण्याला नेहा राजपाल हीच सुमधुर आवाज लाभला आहे. “वेड्या मनातले जे नाते अबोल माझे, सारे कळावे रे तुला…” असे  या गाण्याचे बोल आहेत.

या गाण्याबद्दल चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणतात, ‘नकळत झालेल्या प्रेमाची जाणीव करून देणारे हे गाणे आहे. या गाण्यात गश्मीर आणि मृण्मयी प्रेमाची न बोलता कबुली देत आहेत. या गाण्यामुळे प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढेल. शहरी जीवनशैलीत वाढलेली आरवी जेव्हा गावातील लग्नातही तितकीच समरस होऊन जाते. इतकी मालवणची तिच्यावर जादू झाली आहे. कोकणातील लग्नघर कसे असते, याचेही या गाण्याच्या निमित्ताने दर्शन घडतेय.”

श्री कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटात गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोलेसोबत ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकरही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘विशू’ हा चित्रप 8 एप्रिलपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

“एखादी सावळी अभिनेत्री सांगा, जी सुपरस्टार असेल”; बॉलिवूडमधील वर्णभेदावर नवाजुद्दीनने साधला निशाणा

Karisma Kapoor photo : करिश्मा कपूरने घातला फुलाफुलांचा ड्रेस, नेटकरी म्हणतात “हा तर लहान मुलीचा ड्रेस!”

“अनेकदा उपाशीपोटी झोपलो, बस तिकिटाचेही पैसे नव्हते”; The Kashmir File मधील अभिनेत्याचा संघर्ष

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.