AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepika Padukone : ‘गहराइयां’ चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहूण दीपिका खूश, पोस्ट शेअर करत म्हणाली की….!

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या सोशल मीडियावर सक्रिय दिसते आहे. ती नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते. दीपिकाचा गहराइयां (Gehraiyaan) चित्रपट सध्या चर्चेचा विषय आहे. शकुन बत्राच्या (Shakun Batra) 'गहराइयां' चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला आहे.

Deepika Padukone : 'गहराइयां' चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहूण दीपिका खूश, पोस्ट शेअर करत म्हणाली की....!
दीपिका पादुकोनने गहराइयां चित्रपटासंदर्भात पोस्ट शेअर केली
| Updated on: Feb 19, 2022 | 8:35 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या सोशल मीडियावर सक्रिय दिसते आहे. ती नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते. दीपिकाचा गहराइयां (Gehraiyaan) चित्रपट सध्या चर्चेचा विषय आहे. शकुन बत्राच्या (Shakun Batra) ‘गहराइयां’ चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला आहे. दीपिका पदुकोणच्या उत्कृष्ट अभिनयाची बी-टाऊनमध्ये चर्चा झाली आहे. दीपिकाने आतापर्य़ंत आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत.

गहराइयां चित्रपटासंदर्भात दीपिकाची सोशल मीडियावर पोस्ट

चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला! एक कलाकार म्हणून ‘अलिशा’ हा माझ्यासाठी सर्वात कठीण अनुभव आहे. मी आनंदी आणि नम्र देखील आहे. दीपिका पदुकोणने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक भूमिका केल्या आहेत. चित्रपटामध्ये भूमिका कोणतीही असो, दीपिकाने प्रत्येक व्यक्तिरेखा अतिशय चोखपणे साकारली आहे. दीपिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक खास स्थान निर्माण केले आहे.

इथे पाहा दीपिका पादुकोणची पोस्ट

दीपिकाच्या चित्रपटावर कंगनाची टिका!

काही दिवसांपूर्वी कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दिग्गज अभिनेते मनोज कुमार आणि माला सिन्हा यांच्या चांद सी मेहबूबा या लोकप्रिय गाण्याचा व्हिडिओ शेअर केला होता. हे गाणे हिमालय की लाप में या चित्रपटातील आहे. या गाण्यात मनोज कुमार नदीजवळ बसून गाणे म्हणत होते. त्याचवेळी माला डान्स करते. व्हिडिओ शेअर करताना कंगनाने लिहिले की, ‘मी देखील इतरांसारखीच आहे, पण मला रोमान्स समजतो. नवीन युग, चित्रपटांच्या नावाखाली कचरा विकू नका. वाईट चित्रपट वाईट असतात. स्किन शो आणि पोर्नोग्राफी अशा चित्रपटांना वाचवू शकत नाही. कोणतीही खोल चर्चा नाही हे एक गहराइयां वाली गोष्ट आहे. असे म्हणत कंगनाने दीपिकाला टार्गेट केले होते.

संबंधित बातम्या : 

“एक वेडसर…” म्हणत उर्फी जावेदकडून ट्रान्स्फरंट ड्रेसमधला व्हीडिओ शेअर, चाहते म्हणाले…

Bachchan Pandey : अक्षय कुमारचा बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज, चार तासात तीन मिलियन पार

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.