Kimmarie Johnson : प्रसिद्ध अभिनेत्रीची चटका लावणारी एक्झिट, आठ दिवस दुर्धर आजाराशी झुंज

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल आणि उद्योजिका किमरी जॉनसनचे वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले. हार्ट ॲन्युरिझम या दुर्धर आजाराशी झुंज देताना तिची प्राणज्योत मालवली. 'बेवर्ली हिल्स, 90210' मधील तिच्या अभिनयाने अनेकांना मोहित केले होते. तिच्या निधनाने हॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांना धक्का बसला आहे.

Kimmarie Johnson : प्रसिद्ध अभिनेत्रीची चटका लावणारी एक्झिट, आठ दिवस दुर्धर आजाराशी झुंज
Kimmarie Johnson
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 07, 2026 | 12:05 PM

सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि अभिनयाचा सुरेख संगम असलेली हॉलिवूड अभिनेत्री किमरी जॉनसनने जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी तिला मृत्यूने कवटाळले. हार्ट ॲन्युरिझम या दुर्धर आजाराशी गेल्या काही दिवसांपासून ती झुंज देत होती. अखेर तिची प्राणज्योत मालवली आहे. तिच्या जाण्याने हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. तिचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि जगभरातील तिच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

प्रसिद्ध टीव्ही शो ‘बेवर्ली हिल्स, 90210’ आणि ‘ड्यूड, व्हेयर इज माय कार?’मध्ये किमरी जॉनसनचा दमदार अभिनय पाहायला मिळाला होता. मॉडल आणि अभिनेत्री असलेल्या किमरीला 27 ऑक्टोबर 2026 रोजी अचानक हार्ट इव्हेंट म्हणजे हृदयाशी संबंधित समस्या उद्भवली. त्यामुळे तिला लगेचच लॉस एंजिलिसच्या फेमस सीडर सिनाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिला हार्ट अॅन्युरिझम हा दुर्धर आजार झाल्याचं निदान झालं. त्यामुळे डॉक्टरानी तातडीने उपचार करून तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. पण तिची प्रकृती दिवसे न् दिवस बिघडत गेली. उपचार सुरू असतानाच 4 नोव्हेंबर 2026 रोजी तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. तिने जगाचा निरोप घेतला. किमरीची भाची रोंडा स्कॉटने सोशल मीडियावरून तिच्या जाण्याची माहिती दिली आहे.

Loading...

अभिनेत्री आणि बिझनेस वूमन

पेजेंट क्वीन ते अभिनेत्री असा किमरीचा प्रवास राहिला आहे. सफरपेन्सिल्वेनियाच्या विल्किन्सबर्गमध्ये तिचा जन्म झाला होता. तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिचा सुरुवातीचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी होता. बुद्धिमता आणि अप्रतिम सौंदर्य यामुळे तिने जगात खास स्थान निर्माण केलं होतं. 1992मध्ये तिला मिस पेन्सिल्वेनिया USA पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 1993मध्ये ‘मिस USA’ पेजेंटमध्ये तिने राज्याचं प्रतिनिधित्व केलं होतं. यात तिने टॉप-5 फायनलिस्टमध्ये स्थान मिळवलं होतं.

स्वत:चा ब्रँड

मॉडेलिंगमध्ये यशस्वी झाल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमवायचं ठरवलं. अभिनयाच्या ओढीने तिने थेट कॅलिफोर्निया गाठलं होतं. तिने मोठ्या पडद्यावरही आपली छाप सोडली होती. अभिनय करतानाच तिने उद्योगाकडेही लक्ष दिलं. तिने स्किनग्लो हा बिझनेस सुरू केला. त्यात ती यशस्वी ठरली. तिने ‘किमरी की स्किनग्लो’ (SkinGlow by Kimmarie) नावाने तिने एक प्रिव्हेंटिव्ह स्किनकेयर ब्रँड सुरू केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us