AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफचा ड्रायव्हर थोडक्यात बचावला, गोळी हाताला… काय घडलं नेमकं?

अभिनेता टायगर श्रॉफच्या जुहू येथील घटनेने खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात टायगरचा ड्रायव्हर फिरदौस जखमी झाला, तर अभिनेता थोडक्यात बचावला. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे मुंबईतील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफचा ड्रायव्हर थोडक्यात बचावला, गोळी हाताला... काय घडलं नेमकं?
tiger shroffImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 18, 2026 | 9:36 PM
Share

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर जुहू येथे गोळीबार झाला आहे. या गोळीबारात त्याचा ड्रायव्हर जखमी झाला असून एक रिक्षा चालकही जखमी झाला आहे. तीन हल्लेखोरांनी हा गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पसार झाले. या हल्ल्यात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला आहे. त्याच्या ड्रायव्हरच्या हाताला गोळी लागल्याने तोही थोडक्यात बचावला आहे. गोळी हातावर लागली नसती तर ड्रायव्हरच्या जीवावर बेतू शकलं असतं, असं सांगण्यात आलं आहे.

डीसीपी मोहित गर्ग यांनी टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली आहे. टायगर श्रॉफचा ड्रायव्हर फिरदौस यांच्या हाताला गोळी लागली आहे. एक बाजूला इसम उभा होता, त्यालाही गोळी लागली आहे. मात्र, या हल्ल्यात टायगरचा ड्रायव्हर स्टेबल आहे. गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. टायगर पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती डीसीपी मोहित गर्ग यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश

दरम्यान, या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना फोन करून अभिनेते टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची माहिती घेतली. पोलिस आयुक्तांना त्यांनी तत्काळ वेगाने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

विरोधक आक्रमक

दरम्यान, या हल्ल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी महाराष्ट्राचा बिहार झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. बिहारपेक्षा वाईट परिस्थिती महाराष्ट्राची झाली आहे. आपण पूर्वी बिहारला नावे ठेवत होतो. पण आता आपल्या राज्यात बघा. बाबा सिद्दीकींची हत्या झाली आणि त्यानंतर सलमान खानच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला तरी काही उपयोग नाही आणि वरून गुन्हेगार यासगळ्याची जबाबदारी घेत आहेत. त्यामुळे आपली व्यवस्था किती ढासळली आहे हे गुन्हेगार जबाबदारी घेऊन सांगत आहेत. या निर्धावलेल्या सत्तेचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असं सचिन सावंत म्हणाले.

तर, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही सरकारवर टीका केली आहे. या राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. नेते आणि अभिनेते सुरक्षित राहू शकत नाही, तर सामान्य नागरिक कसे सुरक्षित राहतील? या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री मिळाला पाहिजे ही आमची मागणी पूर्वीपासून आहे आणि पोलिसांना फ्रीडम देऊन काम करण्याची संधी द्यावी. त्यांचा धाक पुन्हा हा गुन्हेगारांवर बसण्यासाठी काम व्हावं, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,