AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफवर धाडधाड गोळीबार… जबाबदारी घेणारा अनिल पंडित कोण?

अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईतील जुहू परिसरात गोळीबार झाला असून, यात तो थोडक्यात बचावला. त्याच्या ड्रायव्हरसह रिक्षाचालक जखमी झाले आहेत. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अनिल पंडितने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. अनिल पंडित एक कुख्यात गँगस्टर असून, त्याने यापूर्वीही अनेक हायप्रोफाईल गुन्ह्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफवर धाडधाड गोळीबार... जबाबदारी घेणारा अनिल पंडित कोण?
tiger shroffImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 18, 2026 | 8:47 PM
Share

अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत गोळीबार करण्यात आला आहे. जुहूच्या पुष्पा पार्क परिसरात हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यातून टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला आहे. या हल्ल्यात टायगर श्रॉफचा ड्रायव्हर आणि स्थानिक रिक्षा चालक जखमी झाला आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगचा गँगस्टर अनिल पंडितने सोशल मीडियावरून पोस्ट करून हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या अनिल बिश्नोईने यापूर्वीही अनेक गुन्ह्यात भाग घेतला होता. तो पुन्हा सक्रिय झाल्याने दहशत निर्माण झाली आहे.

टायगर श्रॉफ हल्ला अपडेट

अभिनेता टाइगरर श्रॉफवर जुहूच्या पुष्पा पार्क परिसरात फायरिंग करण्यात आली

बाइकवरून आलेल्या तीन अज्ञात लोकांनी हा हल्ला केला आहे.

या हल्ल्यात टायगर श्रॉफ थोडक्यात वाचला. त्याचा ड्रायव्हर आणि रिक्षा चालक जखमी झाला आहे.

हल्ल्याचं कारण स्पष्ट नाही

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत

लॉरेन्स बिश्नोई गँगने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

कोण आहे अनिल पंडित?

अनिल पंडित हा कुख्यात गँगस्टर आहे. याच वर्षी जून 2026मध्ये पश्चिम दिल्लीत पंजाबी अभिनेता आणि सिंगर गुरु रंधावा याच्यावर जीममध्ये फायरिंग करण्यात आली होती. त्यावेळीही अनिल पंडितने सोशल मीडियावर पोस्ट करून हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. गुरु रंधावाचे सलमान खानसोबत जवळचे संबंध असल्याने हा हल्ला करण्यात आल्याचं त्याने म्हटलं होतं. तसेच दिल्ली, हरियाणा आणि मुंबईत झालेल्या अनेक हायप्रोफाईल फायरिंगची जबाबदारी त्याने घेतलेली आहे. कधी सोशल मीडियावर पोस्ट करून तर कधी ऑडियोद्वारे धमक्या देऊन त्याने जबाबदाऱ्या घेतल्या आहेत.

दुबईवरून अमेरिकेत

अनिल पंडित हा हरियाणाच्या पानीपत येथील रहिवाशी आहे. तो अमेरिकेत राहतो. तिथूनच त्याचं क्राईम नेटवर्क चालवतो. पोलिसांच्या मते, तो पानीपतच्या रायर कला गावचा रहिवााशी आहे. 2022मध्ये तो नोकरीच्या शोधात दुबईला गेला होता. त्यानंतर तो डंकी मार्गे अमेरिकेत पोहोचल्याचं सांगण्यात येतं. अमेरिकेत त्याची गँगस्टर रणदीप मलिकशी ओळख झाली. त्यानंतर दोघांनी एक ट्रान्सपोर्ट बिझनेस सुरू केला. त्यानंतर दोघांनी संघटीत गुन्हेगारी सुरू केली.

Follow Us
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम