Video : ‘हाsssय, मर जाऊ यहीं पे’ असं म्हणणाऱ्या केकेचा मृत्यू मॉब लिचिंगसारखाच! चाहत्यानं सांगितलं, ऑडिटोरीअमध्ये काय घडलं?

| Updated on: Jun 01, 2022 | 1:32 PM

KK Death Video : ऑडिटोरीअमध्ये एसी काम करत नव्हता, असा आरोप फेसबुक पोस्टमध्ये करण्यात आलाय. तसंच गरजेपेक्षा जास्त प्रेक्षक ऑडिटोरीअमध्ये होते. 2200 प्रेक्षकांची क्षमता असलेल्या ऑडिटोरीअमध्ये पाच हजार पेक्षा जास्त प्रेक्षक होते, असाही आरोप करण्यात आलाय

Video : हाsssय, मर जाऊ यहीं पे असं म्हणणाऱ्या केकेचा मृत्यू मॉब लिचिंगसारखाच! चाहत्यानं सांगितलं, ऑडिटोरीअमध्ये काय घडलं?
फेसबुक पोस्टमधून गंभीर आरोप
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : प्रसिद्ध गायक केकेचा मृत्यू (Singer KK Death) झाला. लाईव्ह कॉन्सर्टनंतर (KK Live Concert Video) त्याला अस्वस्थ वाटू लागलं. रुग्णलयात नेण्यात आलं. पण तिथं त्याला थेट मृत घोषित करण्यात आल्यानं चाहत्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आता लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यानचे वेगवेगळे व्हिडीओ समोर येत आहेत. यात काही प्रेक्षकांनी केकेला गाताना आपल्या कॅमेऱ्यात (KK Last video) कैद केलंय. काहींनी स्टेजवरुन व्हिडीओ काढलेत. काहींनी त्याला रुग्णालयात घेऊन जाता मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलंय. या सगळ्यात केके संदर्भात फेसबुकवर एक पोस्ट लिहिण्यात आली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये केकेच्या मृत्यूआधीचे पाच व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. पाच पैकी एका व्हिडीओमध्ये केके ‘हाय मर जाऊ यहीं पे’ असं म्हणताना दिसलाय. एका ऑडिटोरीअममध्ये सुरु असलेल्या केकेच्या कॉन्सर्टबाबत नेमकं फेसबुक पोस्टमध्ये काय लिहीलंय आणि ते पाच व्हिडीओ काय आहेत, हे जाणून घेऊयात…

फेसबुक पोस्टमध्ये काय?

कोलकाच्या नाझरुल मंच येथील ऑडिटोरीअमध्ये केकेचा कॉन्सर्ट सुरु होता. या कॉन्सर्ट बाबत फेसबुक युज हृषी राज यानं एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये पाच व्हिडीओ शेअर केले आहेत. याच पाच व्हिडीओ केकेच्या मृत्यूची कारणंही सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय.

ऑडिटोरीअमध्ये एसी काम करत नव्हता, असा आरोप फेसबुक पोस्टमध्ये करण्यात आलाय. तसंच गरजेपेक्षा जास्त प्रेक्षक ऑडिटोरीअमध्ये होते. 2200 प्रेक्षकांची क्षमता असलेल्या ऑडिटोरीअमध्ये पाच हजार पेक्षा जास्त प्रेक्षक होते, असाही आरोप करण्यात आलाय. त्यामुळे सुरक्षेचं काय, असा सवालही उपस्थित करण्यात आलाय. आग प्रतिबंधक साधनांनी काही प्रेक्षक जीवघेणा खेळ करत होते, असंही निदर्शनास आलंय.

हे सुद्धा वाचा

पहिल्या व्हिडीओतून काय आरोप?

खचाखच भरलेल्या ऑडिटोरीअममध्ये एसी काम करत नव्हता. त्यामुळे केकेला ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली होती.

दुसऱ्या व्हिडीओत काय आरोप?

रुग्णालयात केकेला घेऊन जाण्याआधी त्याचा पूर्णपणे थकलेला चेहरा कॅमेऱ्यात कैद झालाय. तो पूर्णपणे अशक्त आणि त्राण नसलेल्या शरीराप्रमाणे या व्हिडीओ दिसून आला होता.

तिसऱ्या व्हिडीओमध्ये काय?

काही माथेफिरु प्रेक्षक आग प्रतिबंधक साधनांसोबत भर कॉन्सर्टदरम्यान जीवघेणा खेळ करत असल्याचंही दिसून आलंय.

चौथ्या व्हिडीओमध्ये काय?

चौथ्या व्हिडीओमध्ये केके आपल्या आयुष्याचं शेवटचं गीत गातना दिसून आलाय.

पाचव्या व्हिडीओत ‘मर जावा’ची आर्त हाक

केकेच्या पाचव्या व्हिडीओमध्ये ‘हाय मर जावा यही पै’ असं गाणं परफॉर्म करतानाच दिसून आला आहे.

वयाच्या 53 व्या वर्षी केकेनं अखेरचा श्वास घेतलाय. त्याच्या मृत्यूने संपूर्ण कलाविश्व हळहळलंय. कॉन्सर्टनंतर झालेल्या त्याच्या मृत्यूनं चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकलाय. तर आता केकेच्या मृत्यूवरुन वेगवेगळ्या शंकादेखील उपस्थित केल्या जात आहेत.