AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नानांबद्दल हसता हसता काय म्हणाल्या मेधा मांजरेकर? जुना व्हिडीओ व्हायरल

अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मेधा मांजरेकर यांचा जुना 'नटसम्राट' सिनेमातील अनुभव सांगणारा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे. नानांसोबत काम करताना सुरुवातीला खूप दडपण आल्याचे मेधा सांगतात, पण नानांनी त्यांना कशी मदत केली, अभिनयाचे धडे कसे मिळाले आणि माणूस म्हणून नाना किती मोठे होते, हे या व्हिडिओतून उघड होते.

नानांबद्दल हसता हसता काय म्हणाल्या मेधा मांजरेकर? जुना व्हिडीओ व्हायरल
medha manjrekarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2026 | 4:22 PM
Share

अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. त्यांच्या सोबत काम करणारे त्यांचे सहकलाकार आठवणी सांगत आहेत. नाना पाटेकरांसोबत काम करताना किती दडपण यायचं, पण नाना आपल्या स्वभावाने ते दडपण कसं दूर करायचे याचे किस्सेही अनेकजण सांगत आहेत. नाना पाटेकर आपला रोल कापतील म्हणून काही अभिनेत्यांनी त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. पण प्रत्यक्षात ती भूमिका अधिक दामदार होण्यसााठी नानांनी कशी मदत केली याचे किस्से काही अभिनेत्यांनी सांगितले आहेत. अभिनेत्री मेधा मांजरेकर यांचाही एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. नटसम्राट सिनेमात नानांनी कशी मदत केली, याचे किस्से त्यांनी सांगितलं आहेत. तसेच नाना माणूस म्हणून किती मोठे होते, असंही मेधा मांजरेकर सांगताना दिसत आहेत.

मेधा मांजरेकर यांचा हा व्हिडीओ जुना आहे. नटसम्राट सिनेमा आल्यानंतर त्यांनी दिलेल्या मुलाखतीचा हा पीस आहे. नाना गेल्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. नानांसोबत काम करताना मेधा मांजरेकर भारावून जायच्या. त्यांच्या अभिनयासमोर उभं राहणं हा नेहमीच एक वेगळा अनुभव होता, असं या व्हिडीओत मेधा मांजरेकर साांगताना दिसत आहेत.

तेव्हा नुसतेच बघत राहायचे

नटसम्राट ही माझ्यासाठी एक शाळा होती. त्यातून मला अभिनयाचे मोठे धडे मिळाले. नानांचा अभिनय बघायचा किंवा नानांचे आणि विक्रम गोखल्यांचे सीन व्हायचे तेव्हा मी नुसते बघतच राहायचे. इतका ताकदीचा अभिनय असायचा. या दोघांचा अभिनय मी मॉनिटरवरही बघत नसायचे, तर त्यांच्याकडे टक लावून पाहायचे. यांना कसं जमतं हे सगळं? असा प्रश्न मनात पडायचा, असं मेधा सांगताना दिसत आहेत.

पहिल्यांदा मी खूप घाबरले

नानांबरोबर काम करताना ब्लँक व्हायला व्हायचं. स्वाभाविकच कुणीही होईल. एवढ्या मोठ्या नटासमोर अभिनय करणं कठिणच असतं. मी पहिल्यांदा खूप घाबरले होते. नंतर त्यांनी मला खूप समजून घेतलं. मला कधीही त्यांनी… म्हणजे मला असं वाटायचं का असं त्यांच्याबद्दल बोलतात, असं सांगताना मेधा मांजरेकर खळखळून हसताना दिसत आहेत.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला