AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन पैकी एक इच्छा कधीच पूर्ण झाली नाही, काय होती नाना पाटेकरांच्या मनात सल?

अभिनेता नाना पाटेकर यांच्या मनात वडिलांच्या एका इच्छेची कायम सल राहिली. वडिलांच्या दोन इच्छांपैकी एक (गणपती बसवण्याची परंपरा) नानांनी पूर्ण केली. पण वडिलांच्या हयातीत त्यांना आर्थिक मदत करू शकले नाहीत, ही दुसरी इच्छा अधुरी राहिली. वडिलांच्या अकाली निधनामुळे आणि त्यावेळी असलेल्या हलाखीच्या परिस्थितीमुळे ही खंत नानांना आयुष्यभर बोचत राहिली.

दोन पैकी एक इच्छा कधीच पूर्ण झाली नाही, काय होती नाना पाटेकरांच्या मनात सल?
nana patekarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2026 | 3:35 PM
Share

अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या विविध पैलूंवर चर्चा होत आहे. नानांचा अभिनय, नानांचं सामाजिक कार्य, नानांचा स्वभाव आणि नानांचे किस्से आदींना पुन्हा उजाळा दिला जात आहे. नानांचा स्वभाव तापट होता. त्यांना पटकन राग यायचा. पण ते मनाने अत्यंत प्रेमळ होते. आईवडिलांची प्रत्येक गोष्ट ते ऐकायचे. वडिलांच्या दोन इच्छा त्यांना पूर्ण करायच्या होत्या. त्यातील एक पूर्ण केली. पण दुसरी इच्छा नाना कधीच पूर्ण करू शकले नाही. कारण तोपर्यंत त्यांचे वडील हयात नव्हते. या गोष्टीची त्यांना नेहमीच सल राहिली आहे.

वडिलांची एक इच्छा पूर्ण

नाना पाटेकर हे दरवर्षी गणपती बसवत होते. माटुंगा आणि माहिमच्या दरम्यान त्यांचं घर आहे. त्यांचा भाऊ तिथे राहायचा. या घरात दरवर्षी ते गणपती बसवत होते. नंतर ते पुण्यातील डोणजे या गावी गणपती बसवायला लागले. नाना पाटेकर हे केवळ वडिलांच्या इच्छेखातर घरात गणपती बसवायचे. वडिलांनी घरात गणपती बसवण्याची परंपरा सुरू केली होती. आपल्या नंतर ही परंपरा कायम राहावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे नाना पाटेकर यांनीही वडिलांच्या इच्छेचा मान म्हणून ही परंपरा कायम ठेवली. इतकंच नव्हे तर गणपती समोरची सजावट नाना पाटेकर स्वत: करायचे. अंगात बंडी घातलेले नाना गणपती समोर फुलांची आरास करताना अनेकांनी पाहिले असतील.

दुसरी इच्छा अर्धवट

नाना पाटेकर 28 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. नाना पाटेकरांच्या मनात वडिलांबद्दल प्रचंड आदर होता. ते नेहमी वडिलांची आठवण करायचे. वडिलांबद्दल बोलायचे. आपल्या मेहनतीच्या कमाईचा एक रुपयाही वडिलांच्या हातावर ठेवू शकले नाही, याची सल त्यांच्या मनात कायम राहिली होती. आपल्या वडिलांसाठी काही तरी करण्याची त्यांची इच्छा होती. पण ती इच्छा ते पूर्ण करू शकले नाही. त्यांच्या वडिलांचा शेवटचा काळ अत्यंत कठिण होता. अत्यंत वाईट अवस्थेत ते जगले. महापालिकेच्या रुग्णालयात वडिलांवर उपचार करण्यात आले होते. त्यावेळी नाना पाटेकर यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट होती. वडिलांच्या औषधाएवढे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. या कठिण प्रसंगात नानांना त्यांच्या मित्रांनी साथ दिली. त्यामुळे वडिलांना गमावल्याची आणि त्यांच्यासाठी काहीच करता न आल्याची खंत त्यांच्या मनात कायम होती.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला