सर्वात मोठी बातमी ! अखेर ज्ञानेश कुमार यांनी घेतला निर्णय; अवघ्या 20 महिन्यातच…
ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगात 20 महिन्यांत 18-20 मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. SIR वादाच्या पार्श्वभूमीवर हे मोठे प्रशासकीय फेरबदल झाले असून, यामुळे आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एसआयआरवरून संपूर्ण देशात वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानेही कात टाकायला सुरुवात केली आहे. एसआयआरचा वाद निर्माण होताच निवडणूक आयोगाने प्रशासकीय रचनेत फार मोठे फेरबदल केले आहेत. वर्ष 2025 आणि 2026च्या दरम्यान राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात सुमारे 18 ते 20 मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या (CEO) बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये पदभार स्वीकारला होता. त्यानंतर 20 महिन्यातच एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्याने चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे याच काळात एसआयआर लागू करण्यात आला आहे.
द इकॉनॉमिक टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या काळात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सोबतच निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकारी, खासकरून उप निवडणूक आयुक्त (DEC) स्तरावरही अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत.
किती अधिकाऱ्यांच्या बदल्या?
आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांमध्ये मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या होत राहिल्या आहेत. पण 2025-26 हा काळ अपेक्षेपेक्षा अधिक व्यस्त होता.
फेब्रुवारी 2025 पासून आतापर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीला 20 महिन्यात सुमारे 18 ते 20 मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
मे 2022 ते फेब्रुवारी 2025 : माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या सुमारे 33 महिन्याच्या कार्यकाळात सुमारे 23 मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. या काळात 2024ची लोकसभा निवडणूकही झाली.
यापूर्वीचे 41 महिने : मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा आणि सुशील चंद्रा यांच्या कार्यकाळात 29 मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. या काळातही लोकसभा निवडणुका झाल्या.
रिपोर्टनुसार, लोकसभा निवडणुकीत नेहमीच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मा६, 2025 आणि 2026 मध्ये अधिकाऱ्यांच्या बदलींचा सिलसिला कायम होता.
कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच…
निवडणूक आयोगात प्रशासकीय सातत्य ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना कमीत कमी तीन वर्षापर्यंत एकाच ठिकाणी ठेवलं जातं. पण काही आकडे पाहिले तर, सात अधिकाऱ्यांच्या बदल्या तीन वर्षाच्या आत झाल्याचं समोर आलं आहे. म्हणजे अवघ्या दोन वर्षाच्या कमी काळातही या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 2025मध्ये 8 ते 9 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर 2026मध्ये आतापर्यंत कमती कमी 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
2026मध्ये असंख्य बदल्या
जानेवारी 2026 : पंजाबमध्ये नव्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली.
फेब्रुवारी 2026 : दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी आर. एलिस वाज यांची बदली करण्यात आली. रिपोर्टनुसार, त्यांनी एसआयआरशी संबंधित महत्त्वाची कामे केली होती. दिल्लीत त्यावेळी एसआयआरची प्रतिक्षा होती. याच महिन्यात गुजरातला नवीन मुख्य निवडणूक अधिकारी मिळाला.
मार्च 202 6 : सिक्किमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी बदलण्यात आले.
एप्रिल 2026 : चंदीगडमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती.
त्यानंतर विधानसभा निवडणुकी संपन्न करण्यात आलेल्या राज्यातही मुख्य निवडणूक अधिकारी बदलण्यात आले.
बंगाल, केरळची चर्चा
पश्चिम बंगालमध्ये विधानसबआ निवडणुकीनंतर मुख्य निवडणूक अधिकारी मनोज अग्रवाल राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर नीलम मणि यांना मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी दिली.
केरळमध्ये ऑगस्ट 2026मध्ये डी. सजित बाबू यांनी रतन यू. केळकर यांच्या जागी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून पदभार सांभाळला. रिपोर्टनुसार, विधानसभा निवडणुकीनंतर केळकर यांना मुख्यमंत्री व्ही. डी. सतिशन यांचा सचिव म्हणून नियुक्त करण्यात आल्याने वाद झाला होता.
